*तुळसवडे नं 1 शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कृतज्ञतेचा अनोखा सन्मान: स्वयंपाकी काकूंना साडी-चोळी भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*तुळसवडे नं 1 शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कृतज्ञतेचा अनोखा सन्मान: स्वयंपाकी काकूंना साडी-चोळी भेट*
*तुळसवडे नं 1 शाळेच्या विद्यार्थ्यांकडून कृतज्ञतेचा अनोखा सन्मान: स्वयंपाकी काकूंना साडी-चोळी भेट*
राजापूर(प्रतिनिधी):-शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे मंदिर नसून संस्कारांचे विद्यापीठ असते, याची प्रचिती जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा तुळसवडे नं. 1 येथे नुकतीच अनुभवायला मिळाली. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाच्या निमित्ताने शाळेतील स्वयंपाकी महिलांना साडी -चोळी भेट देत कृतज्ञतेचा भावपूर्ण सन्मान केला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे शाळेचा परिसर काही काळ भावनांनी ओलावून गेला. रोज प्रेमाने आणि मायेने विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवणाऱ्या सौ. मीनाक्षी आडिवरेकर व सौ. मनिषा मंगेश सुतार या स्वयंपाकी काकूंना विद्यार्थ्यांनी साडी भेट देत त्यांच्या ऋणाची जाणीव व्यक्त केली. या अनपेक्षित सन्मानामुळे दोन्ही काकूंच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले “जन्मदात्री आई आणि सांभाळ करणारीही आईच असते,” या भावनेतून विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. पुस्तकी ज्ञानासोबत सामाजिक भान, कृतज्ञता आणि माणुसकीचे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजत असल्याचे या प्रसंगातून अधोरेखित झाले.
या उपक्रमासाठी मुख्याध्यापक प्रविण लक्ष्मण किंजळस्कर, उपशिक्षक सुग्रीव किसनराव मुंडे आणि पदवीधर शिक्षक प्रसाद प्रकाश दरडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या या संवेदनशील कृतीमुळे उपस्थित पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले.



