*नंदुरबार जिल्हयात "गोरक्षक सेल" ची स्थापना, गोवंशाची अवैध वाहतूक, विक्री व कत्तल रोखण्यासाठी विशेष पथक सज्ज*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हयात "गोरक्षक सेल" ची स्थापना, गोवंशाची अवैध वाहतूक, विक्री व कत्तल रोखण्यासाठी विशेष पथक सज्ज*
*नंदुरबार जिल्हयात "गोरक्षक सेल" ची स्थापना, गोवंशाची अवैध वाहतूक, विक्री व कत्तल रोखण्यासाठी विशेष पथक सज्ज*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हयात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष "गोरक्षक सेल" स्थापना करण्यात आला आहे. गोवंशाची अवैध वाहतूक, विक्री तसेच कत्तल यांसारख्या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी हे विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे. सदर "गोरक्षक दल" सेलमध्ये 1 पोलीस अधिकारी व 6 अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, "अवैधरित्या गोवंश वाहतूक, विक्री व कत्तल बाबत कुठलीही माहिती असल्यास नागरिकांनी त्वरीत हेल्पलाईन क्रमांक 9028954510 यावर संपर्क साधावा. तसेच माहिती देणाऱ्याची ओळख गोपनिय ठेवण्यात येईल."पोलीस उपनिरीक्षक भूणेश मराठे शहर पोलीस स्टेशन, नंदुरबार स्थानिक गुणांविषयी शाखेचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल आनंदा मराठे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ललित गवळी, कॉन्स्टेबल विशाल मराठे, पोलिस मुख्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल रोहित राजपूत यांची नेमणूक करण्यात आली असून पोलीस विभागातर्फे हेल्पलाइन मोबाईल क्रमांक 9028954510 जनहितार्थ जारी करण्यात आला आहे.



