*आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनो,दि.15 मे 2026 रोजी आशा सेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधिचे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन यशस्वी, ऑक्टोबर 2025 पासूनचा थकीत केंद्र हिस्सा मानधन आणि सन 2023 पासून जन
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनो,दि.15 मे 2026 रोजी आशा सेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधिचे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन यशस्वी, ऑक्टोबर 2025 पासूनचा थकीत केंद्र हिस्सा मानधन आणि सन 2023 पासून जन
*आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनो,दि.15 मे 2026 रोजी आशा सेविका व गटप्रवर्तक प्रतिनिधिचे जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन यशस्वी, ऑक्टोबर 2025 पासूनचा थकीत केंद्र हिस्सा मानधन आणि सन 2023 पासून जननी सुरक्षा योजनेच्या कामाचा थकीत मोबदला आशा सेविकांना मिळणार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर यांच्याची शिष्टमंडळाने केली चर्चा*
जळगांव(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना ऑक्टोबर 2025 पासूनचा केंद्र हिस्सा कामाचा थकीत मोबदला अदा करून आशा सेविकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची आर्थिक उपासमार थांबवावी. आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या आदेशानुसार जननी सुरक्षा योजनेच्या लाभासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी लाभार्थीची असतांना देखील आशा सेविकांना सन 2023 पासूनचा कागदपत्रे आभावी काम करूनही जननी सुरक्षा योजनेचा कामाचा मोबदला अदा केला जात नाहीये सदर अन्याय दूर करून दरमहा जननी सुरक्षा योजनेच्या कामाचा मोबदला अदा करावा. या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. म्हणून यांसह गटप्रवर्तक आणि आशा सेविकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवून होत असलेला अन्याय दूर करावा.
यासाठी मागणीसाठी जळगांव जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे प्रतिनिधी रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि. 15 मे 2026 रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करणार असल्याची नोटीस युनियनने जिल्हा परिषद प्रशासनाला दिली होती. परिणामी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी बैठकीबाबत युनियनला दि. 13 मे 2026 रोजी दिलेले पत्र आणि जिल्ह्यात वाढलेले तापमान याबाबींचा गंभीर विचार करून धरणे आंदोलन पुढे ढकलण्याचा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्याचा निर्णय युनियनने घेतला होता.
त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर यांना रामकृष्ण बी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन देत खालीलप्रमाणे सविस्तर चर्चा केली.सदर चर्चेत ऑक्टोबर 2025 पासूनचा केंद्र हिस्सा थकीत मोबदल्याचा निधी प्राप्त झाला अदा करण्याची प्रक्रिया सुरु असून येत्या आठ दिवसात आशाताईच्या बँक खात्यात जमा केला जाईल. संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या पत्रानुसार जननी सुरक्षा योजनेच्या कामाचा सन 2023 पासूनचा थकीत मोबदला या महिन्याअखेर अदा केला जाईल. असे सांगत आजच संबंधिताना पत्र देऊन आदेशित करावे अशी सूचना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सी.ई.ओ.नी बैठकीतच दिली. तसेच यापुढे आशा ताईंना दिला जाणारा कामाचा मोबदला आधार कार्ड बेसवर अदा केला जाणार आहे. म्हणून सर्व आशा स्वयंसेविकांनी बँक खात्याशी आपले आधार कार्ड लिंक करण्याबाबत युनियननेही आपल्या स्तरावर आशाताईना सूचना करावी असेही सी.ई. ओ.यांनी सूचित केले. सदर चर्चेमुळे सन 2023 पासूनचा जननी सुरक्षा योजनेच्या मोबदल्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून युनियनने केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सदर बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शिष्टमंडळात रामकृष्ण बी. पाटील, श्रीमती कल्पना भोई, सुनंदा पाटील, भारती नेमाडे, भारती तायडे, नम्रता पाटील, चंद्रकला घोलाणे यांनी भागीदारी केली.



