*“मिशन सक्षम”अंतर्गत जिल्ह्यातील युवकांना, मोफत कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची सुवर्णसंधी-मंगेश वाघ*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*“मिशन सक्षम”अंतर्गत जिल्ह्यातील युवकांना, मोफत कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची सुवर्णसंधी-मंगेश वाघ*
*“मिशन सक्षम”अंतर्गत जिल्ह्यातील युवकांना, मोफत कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराची सुवर्णसंधी-मंगेश वाघ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि 'प्रथम एज्युकेशन फाउंडेशन' (Pratham Education Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने "मिशन सक्षम" हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील बेरोजगार युवक -युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना हक्काची उपजीविका मिळवून दिली जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश वाघ यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
18 ते 30 वयोगटासाठी सुवर्णसंधी,
या उपक्रमाचा मुख्य उद्देश 18 ते 30 वयोगटातील तरुण -तरुणींना अल्पकालीन आणि प्रमाणित प्रशिक्षण देणे हा आहे. या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे यात 80 टक्के प्रात्यक्षिक (Practical) आणि केवळ 20 टक्के सैद्धांतिक (Theory) शिक्षणावर भर दिला जातो. याशिवाय युवकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखतीची पूर्वतयारी आणि थेट उद्योगभेटी (Industry Visits) घडवून आणल्या जाणार आहेत. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीच्या उत्तम संधीही उपलब्ध करून दिल्या जातील. विविध क्षेत्रांतील प्रशिक्षण अभ्यासक्रम,
“मिशन सक्षम” अंतर्गत खालील कौशल्याधारित कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाईल, तांत्रिक क्षेत्र, इलेक्ट्रिकल, सोलर पीव्ही इन्स्टॉलर, प्लंबिंग, वेल्डिंग, सीएनसी मशीन ऑपरेटर. बांधकाम क्षेत्र, गवंडी काम/बांधकाम, फॉल्स सीलिंग आणि ड्रायवॉल इन्स्टॉलर .
ऑटोमोबाईल, 2 व 4 चाकी वाहन दुरुस्ती. सेवा क्षेत्र, हेल्थकेअर सहाय्यक सेवा आणि हॉस्पिटॅलिटी (फूड अँड बेव्हरेज, हाऊस कीपिंग, फूड प्रोडक्शन). त्वरित नोंदणी करण्याचे आवाहन, यापूर्वी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या अशा उपक्रमांना तरुणांचा मोठा प्रतिसाद लाभला होता. यंदाही जिल्ह्यातील अधिकाधिक युवक -युवतींनी या मोफत संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या क्युआर (QR) कोड स्कॅन करून किंवा शिवाजी कदम मोबाईल क्र. 8422936965 (फक्त व्हॉट्सॲप मेसेज) यांच्याशी संपर्क साधून आपली नोंदणी त्वरित पूर्ण करावी. असेही कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



