*नंदुरबार जिल्ह्याचा राज्यस्तरावर गौरव घोषीत ग्रामपंचायत ढेकवदला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्ह्याचा राज्यस्तरावर गौरव घोषीत ग्रामपंचायत ढेकवदला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार*
*नंदुरबार जिल्ह्याचा राज्यस्तरावर गौरव घोषीत ग्रामपंचायत ढेकवदला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्यस्तरीय तृतीय पुरस्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या "महा आवास अभियान सन 2023-24" च्या राज्यस्तरीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली असून, नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायत ढेकवद यांनी "सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत बांधकाम" या प्रकारात राज्यातील तृतीय क्रमांकाचा मानाचा पुरस्कार पटकावून नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
ग्रामीण भागातील घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गुणवत्तापूर्ण बांधकाम, नियोजनबध्द कार्यपध्दती, लाभार्थी केंद्रीत दृष्टीकोन तसेच उपलब्ध मर्यादीत जागेत नाविन्यपूर्ण बहुमजली घरकुल उभारणी या वैशिष्टयामुळे ग्रामपंचायत ढेकवद यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची प्रभावी अंमलबजावणी करून आदर्श निर्माण केला आहे.
या उल्लेखनीय यशामुळे ग्रामपंचायत ढेकवदचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी तसेच पंचायत समिती नंदुरबार येथील अधिकारी व पदाधिकारी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असुन ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना या पुरस्कारामुळे राज्यस्तरावर मान्यता मिळाली आहे. या यशामध्ये तत्कालीन गटविकास अधिकारी, जयवंत उगले, सध्या कार्यरत गट विकास अधिकारी, अर्चना वाघमोडे, सरपंच, विनुबाई ताराचंद पाडवी, ग्रामपंचायत अधिकारी, अनिल चंपक वळवी, गृह निर्माण अभियंता, मोईन काझी व पठाण, ग्रामरोजगार सेवक, गजानन शंकर पाटील व नंदुरबार पंचायत समितीतील Housing Cell मधील अधिकारी व कर्मचारी, मनरेगा विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित क्षेत्रीय यंत्रणेचे मोलाचे योगदान राहिले आहे. सर्वांनी एकत्रितपणे समन्वयातून केलेल्या कार्यामुळे हे यश शक्य झाले असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही ग्रामीण भागातील बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सुरक्षित व सन्मानजनक निवास उपलब्ध करून देणारी केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतर्गत नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घरकुलांची उभारणी करण्यात येत असून, अनेक लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत ढेकवदने विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे. केंद्रीय मंत्री, ग्रामीण विकास, कृषी व किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या शुभहस्ते तसेच मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थी मेळावा व महा आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम शुक्रवार, दिनांक 15 मे 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता सैनिक स्कूल, सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अधिकारी व पदाधिकारी यांचा राज्यस्तरावर सन्मान करण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील या यशामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण विकास कार्याची राज्यभर दखल घेतली जात असून, जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनाही प्रेरणा मिळणार आहे. भविष्यातही ग्रामीण विकास, घरकुल योजना व जनहिताच्या उपक्रमांमध्ये जिल्हा अधिक प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



