*श्रीराम विद्यालय वेरवलीचा निकाल 99.44% कु.तन्मय चव्हाण प्रथम तर सानिका शेलारने पटकावला द्वितीय क्रमांक*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*श्रीराम विद्यालय वेरवलीचा निकाल 99.44% कु.तन्मय चव्हाण प्रथम तर सानिका शेलारने पटकावला द्वितीय क्रमांक*
*श्रीराम विद्यालय वेरवलीचा निकाल 99.44% कु.तन्मय चव्हाण प्रथम तर सानिका शेलारने पटकावला द्वितीय क्रमांक*
लांजा(प्रतिनिधी):-वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ वेरवली बु संचलित श्रीराम विद्यालय वेरवलीने माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2026 मध्ये घवघवीत यश संपादन केले असून परीक्षेस बसलेल्या 36 विद्यार्थ्यांपैकी 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या हायस्कूल मधून कु. तन्मय संदिप चव्हाण यांने 88.60% गुण मिळवून प्रथम क्रमांक तर कु.सानिका शेलार हिने 87.40% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला कु. आर्या बोडसने 87.20 गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळविला
हायस्कूलचा एकूण निकाल 94.44% इतका लागला असून यशस्वी विद्यार्थ्यांवर वेरवली पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर प्रशालेचे मुख्याध्यापक अरुण डोळे तसेच सहकारी शिक्षक वृंदाचे कौतुक होत आहे.