*के.आर.पब्लिक स्कुलचा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा विशाल सिंह जिल्हयात प्रथम सी.बी.एस.ई.12 वी विज्ञान शाखेचा 100% निकाल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कुलचा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा विशाल सिंह जिल्हयात प्रथम सी.बी.एस.ई.12 वी विज्ञान शाखेचा 100% निकाल*
*के.आर.पब्लिक स्कुलचा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा विशाल सिंह जिल्हयात प्रथम सी.बी.एस.ई.12 वी विज्ञान शाखेचा 100% निकाल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के.आर. पब्लिक स्कुल व ज्यु.कॉलेज नंदुरबार 13 मे 2026 रोजी सी.बी.एस.ई.ने 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा 12 वी विज्ञान शाखेचा निकाल जाहिर झाला असुन त्यात विशाल गुलाब सिंह 90.80 % प्रथम, हितेश भिमा चौधरी 86.00 % द्वितीय, जुही अनिल राजपुत 84.00 % तृतीय, यशश्री देवराम गावीत 83.80% चौथी, शौर्य यज्ञेश सोनी 82.40% पाचवा या क्रमांकाने उत्तीर्ण झालेत. सदर विद्यार्थ्यांनी के. आर. पब्लिक स्कूलची उज्वल यशाची परंपरा कायम राखली.
त्यांच्या या उत्कृष्ट यशा बद्दल संस्थेचे चेअरमन किशोर वाणी, व्हा. चेअरमन सिध्दार्थ वाणी, सौ. केतकी वाणी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच प्राचार्य डॉ. छाया शर्मा, नदीम शेख, संतोष कुलकर्णी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.