*14 मे ला निवृत्तीवेतन धारकांसाठी मेळाव्याचे आयोजन, निवृत्ती वेतनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन-संजय खडसे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*14 मे ला निवृत्तीवेतन धारकांसाठी मेळाव्याचे आयोजन, निवृत्ती वेतनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन-संजय खडसे*
*14 मे ला निवृत्तीवेतन धारकांसाठी मेळाव्याचे आयोजन, निवृत्ती वेतनधारकांना उपस्थित राहण्याचे आवाहन-संजय खडसे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा गुरुवार, दिनांक 14 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, नंदुरबार येथे संपन्न होईल, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. या मेळाव्याचा मुख्य उद्देश निवृत्ती वेतनधारकांना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेऊन त्या तातडीने सोडवणे हा असून जिल्ह्यातील सर्व संबंधित पेन्शनर्सनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. तसेच 80 वर्षांवरील राज्य शासकीय कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या वयाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये खालीलपैकी कागदपत्रे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या पेन्शन विभागात जमा करावीत: जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील वयाचा दाखला. मोठ्या अपत्याच्या जन्म तारखेचा पुरावा. हे कागदपत्रे जमा केल्याने वयानुसार मिळणाऱ्या अतिरिक्त लाभांची प्रक्रिया सुलभ होणार आहे. अधिक माहितीसाठी निवृत्ती वेतनधारकांनी जिल्हा कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा कोषागार अधिकारी खडसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



