ताजा खबरे:
*जायकासह महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता*
*जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान, दुर्मिळ रक्तगटासाठी रक्त उपलब्ध करून रुग्णाला दिलासा*
*वाटूळ येथील संतोष चव्हाण यांनी तिवंदामाळ येथील जमीन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाला दिली विनामूल्य भेट*
*कोळंब येथे 9 ते 11 मे दरम्यान "शिवछत्रपती चषक - 2026 "भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*रब्बी पणन हंगामासाठी ज्वारी-मका-बाजरी नोंदणीस 15 मेपर्यंत मुदतवाढ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान, दुर्मिळ रक्तगटासाठी रक्त उपलब्ध करून रुग्णाला दिलासा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान, दुर्मिळ रक्तगटासाठी रक्त उपलब्ध करून रुग्णाला दिलासा*

  • Share:

*जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान, दुर्मिळ रक्तगटासाठी रक्त उपलब्ध करून रुग्णाला दिलासा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-रक्त केंद्र, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे प्रथमच अत्यंत दुर्मिळ असलेल्या ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान करण्यात आले असून संबंधित रुग्णासाठी आवश्यक रक्तघटक उपलब्ध करून देण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. ही कामगिरी जिल्हा रुग्णालयासाठी अत्यंत उल्लेखनीय व कौतुकास्पद मानली जात आहे.
‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हा जगातील अत्यंत दुर्मिळ रक्तगटांपैकी एक असून वैद्यकीय भाषेत त्याला ‘एचएच रक्तगट’ असे संबोधले जाते. सामान्यतः A, B, AB आणि O या रक्तगटांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारा ‘H Antigen’ हा घटक या रक्तगटात पूर्णतः अनुपस्थित असतो. त्यामुळे हा रक्तगट इतर रक्तगटांपेक्षा वेगळा ठरतो. भारतात साधारण दहा हजार व्यक्तींमागे एका व्यक्तीत हा रक्तगट आढळतो. विशेषतः महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात तो तुलनेने अधिक प्रमाणात आढळून येतो. या रक्तगटाच्या व्यक्तींना केवळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चेच रक्त देता येते. चुकीने ‘O’ रक्तगट समजून रक्त दिल्यास गंभीर प्रतिक्रिया होऊ शकते. त्यामुळे अचूक तपासणी व योग्य निदान करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. सदर रुग्ण हे पोस्ट गंगापूर, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार येथील असून या दुर्मिळ रक्तगटासाठी रक्त उपलब्ध करणे ही मोठी आव्हानात्मक प्रक्रिया होती. मालेगाव येथील रक्तदाता साजिद अन्सारी तसेच रक्तदाता समूहातील अस्लम शेख अन्सारी व एजाज अहमद यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. रक्तदाता शोध मोहिमेत विक्रम यादव, चोपडा येथील दीपक जैन व नंदुरबार येथील राकेश चौधरी यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
मालेगाव रक्त केंद्राचे संचालक कैलास सोनवणे व अधिकारी-कर्मचारी वृंद यांनी रक्त संकलनासाठी विशेष सहकार्य केले. तसेच वाहनचालक विनय वळवी, रक्तकेंद्र वैज्ञानिक अधिकारी जयेश सोनवणे व प्रीतम मेंथेवाड यांनी तत्परतेने त्याच रात्री उशिरापर्यंत ‘बॉम्बे ब्लड’ची बॅग नंदुरबार रक्त केंद्रात पोहोचवून सकाळी रुग्णाला रक्त देण्यासाठी आवश्यक ‘क्रॉस मॅच’ व इतर चाचण्या पूर्ण केल्या. दरम्यान, रक्त केंद्र, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे सन 2025 मध्ये सहा हजारांहून अधिक रक्तसंकलन करून नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनय सोनवणे तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. रक्त संक्रमण अधिकारी डॉ. रमा वाडीकर व रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी प्रीतम मेंथेवाड यांनी या निदान प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावली. या उल्लेखनीय कार्याबद्दल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून जिल्ह्यातील नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जायकासह महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्र बळकट करण्यासाठी नवे पाऊल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जायकाकडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्यता*
May, 06 2026
*जिल्हा रुग्णालयात प्रथमच ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’चे यशस्वी निदान, दुर्मिळ रक्तगटासाठी रक्त उपलब्ध करून रुग्णाला दिलासा*
May, 06 2026
*वाटूळ येथील संतोष चव्हाण यांनी तिवंदामाळ येथील जमीन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाला दिली विनामूल्य भेट*
May, 06 2026
*कोळंब येथे 9 ते 11 मे दरम्यान "शिवछत्रपती चषक - 2026 "भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
May, 06 2026
*रब्बी पणन हंगामासाठी ज्वारी-मका-बाजरी नोंदणीस 15 मेपर्यंत मुदतवाढ*
May, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज