*वाटूळ येथील संतोष चव्हाण यांनी तिवंदामाळ येथील जमीन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाला दिली विनामूल्य भेट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वाटूळ येथील संतोष चव्हाण यांनी तिवंदामाळ येथील जमीन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाला दिली विनामूल्य भेट*
*वाटूळ येथील संतोष चव्हाण यांनी तिवंदामाळ येथील जमीन राजापूर लांजा तालुका नागरिक संघाला दिली विनामूल्य भेट*
वाटूळ(प्रतिनिधी):-राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबई या संस्थेचे अध्यक्ष सुभाष लाड यांच्या पासष्टीनिमित्त लांजा येथे आयोजित केलेल्या गौरव ग्रंथ प्रकाशन समारंभात त्यांना रुपये पासष्ट हजारांची थैलीही प्रदान करण्यात आली त्यावेळी गौरव मूर्ती सुभाष लाड यांनी त्या रकमेत स्वतःचे पस्तीस हजार रुपये जोडून रुपये एक लाख रुपयांची रक्कम संघाकडे सुपूर्त करीत असल्याचे जाहिर केले. ती रक्कम संघाच्या कार्यालयीन इमारती करीता वापरण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली व सदरच्या इमारती करीता राजापुरात जागा शोधण्याकरीता कामास लागावे असे आवाहन त्यांनी केले. त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले वाटुळ गावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते संतोष श्रीधर चव्हाण यांनी व्यासपीठावरती येऊन आपण राजापूर लांजा तालुका नागरिक संघाकरिता वाटुळ गावातील तिवंदे माळ येथील मुंबई गोवा हम रस्त्याला लागून महापुरुष मंदिरा शेजारील आपल्या मालकीची पाच गुंठे जमीन आपले वडील सुप्रसिद्ध भजन गायक स्व. शिरी बुवा तथा श्रीधर चव्हाण यांच्या स्मरणार्थ विनामूल्य देत असल्याचे जाहीर केले. चांगल्या कामाला लवकरच सुरुवात करावी या भावनेने संतोष चव्हाण यांच्या सुचनेनुसार दि. 4 मे 2026 रोजी सकाळी नऊ वाजता वाटुळ गावचे ग्रामस्थ व राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे कार्यकर्ते एकत्र येऊन वाटुळ गावचे ग्रामदैवत महादेवाचे दर्शन घेऊन व सर्व मिळून तिवंदे माळ येथे संघास मिळालेल्या जागेची पाहणी केली. त्या जागेवरती जमीन मालक संतोष चव्हाण यांनी फुले वाहून जमीन राखणदारास' ही जागा राजापूर लांजा तालुका नागरिक संघाकडे सुपूर्द करीत असून या जागेत त्यांना सुख समाधान लाभावे' असे गाऱ्हाणे घातले व श्रद्धेचे श्रीफळ वाढवले. या शुभ समयी संघाकडून संतोष चव्हाण यांना सुप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संघातर्फे सन्मानित करण्यात आले. संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी जमीन देणगीदार संतोष श्रीधर चव्हाण यांच्या दातृत्वाचे कौतुक करुन लवकरच संघाचे राजापुरात कार्यालय तसेच समाजोपयोगी इमारत उभी राहिल याबद्दल समाधान व्यक्त केले. अशीच व्यवस्था व कार्यालय लांजा मध्येही उभे राहिल, त्यासाठी दानशूर नंदकुमार पाटोळे यांनी देऊ केलेली जागा लवकरच संघाकडे येईल अशी आशा व्यक्त केली. या छोटेखानी सुंदर कार्यक्रमात
ह.भ.प. बाळकृष्ण बुवा चव्हाण, विश्वास वि. चव्हाण, सुहास स. चव्हाण, संतोष म. भुर्के, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खामकर, महेंद्र साळवीसर, काशिनाथ चव्हाण, जयराज मांडवकर, प्रकाश वळंजू , संजय वि. चव्हाण, सौ. स्मिता बोधनकर, सौ वीणा वि. चव्हाण, सौ. नंदा बा. चव्हाण, सौ.वर्षा कृ.चव्हाण हे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे नियोजन संघाचे पदाधिकारी विराज चव्हाण यांनी केले.



