*कोळंब येथे 9 ते 11 मे दरम्यान "शिवछत्रपती चषक - 2026 "भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोळंब येथे 9 ते 11 मे दरम्यान "शिवछत्रपती चषक - 2026 "भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
*कोळंब येथे 9 ते 11 मे दरम्यान "शिवछत्रपती चषक - 2026 "भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन*
पाचल(प्रतिनिधी):-राजापूर तालुक्यातील कोळंब येथील छत्रपती मित्र मंडळाच्यावतीने दि. 9 मे ते 11 मे 2026 या दरम्यान गावमर्यादित भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय आत्माराम पाटील क्रीडांगणावर या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. छत्रपती मित्र मंडळ हे गेले अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. गावच्या विकास कामात देखील या मंडळाचे महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. ग्रामीण भागातील खेळाडूना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे, त्यांच्या अंगीकृत कला गुणांना वाव मिळवा, या उद्देशाने या स्पर्धाचे आयोजन करण्यात आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश फी 1500 रुपये ठेवण्यात आलेली आहे.
स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 15555 रुपये आणि छत्रपती चषक, द्वितीय पारितोषिक 9999 व छत्रपती चषक, तृतीय क्रमांकासाठी 5555 व छत्रपती चषक, अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच इतर वैयक्तिक आकर्षक बक्षिसे ही ठेवण्यात आलेली आहेत. या स्पर्धेत खेळाडूनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन छत्रपती मित्र मंडळ कोळंब यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संजय पाटेकर, मोबाईल नं. 9403940856, सत्यवान पाटेकर, मोबाईल नं. 9322137169, प्रसाद पाटेकर, मोबाईल नं. 7666230793,. राजेंद्र पाटेकर, मोबाईल नं 976953६305, संकेत पाटेकर, 8693021380 संतोष राठोड, 8082776527.या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.



