*कै दगडूशेठ जाधव पुण्यतिथीनिमित्त जाधव परिवारा मार्फत 501 लिटर ताकचे वाटप*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कै दगडूशेठ जाधव पुण्यतिथीनिमित्त जाधव परिवारा मार्फत 501 लिटर ताकचे वाटप*
*कै दगडूशेठ जाधव पुण्यतिथीनिमित्त जाधव परिवारा मार्फत 501 लिटर ताकचे वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक व प्रतिष्ठित व्यापारी कै. दगडूशेठ जाधव यांच्या 46 व्या पुण्यतिथीनिमित्त जाधव परिवारातर्फे वाढते तापमान व उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे उन्हात नागरिकांची तृष्णा भागविण्यासाठी थंडगार ताकचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी 501 लिटर ताक वाटप करण्यात आले. येथील भगवान रेस्टोरंट भतवाल टॉकीज समोर कै. दगडूशेठ जाधव यांच्या 46 वा स्मृतिदिनानिमित्त जाधव परिवारातर्फे थंडगार ताकचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सुमारे 501 लिटर थंडगार ताक चे वाटप यावेळी करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी, श्याम मराठे, गजेंद्र शिंपी, माणिक माळी, महेंद्र फटकाळ, राजेंद्र चौधरी, किसन जाधव, रामदास जाधव, योगेश जाधव, अभिजीत जाधव, भारत जाधव, भरत चौधरी, आकाश जैन, प्रितेश सोनार यांच्यासह व्यावसायिक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.



