*बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास मा. न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सश्रम कारावास व रुपये 16 हजार दंडाची शिक्षा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास मा. न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सश्रम कारावास व रुपये 16 हजार दंडाची शिक्षा*
*बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास मा. न्यायालयाने ठोठावली 20 वर्षे सश्रम कारावास व रुपये 16 हजार दंडाची शिक्षा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सोनगीरपाडा या गावात फिर्यादी हे आईच्या व भावांच्या घराचे बांधकाम करणे असल्याने दि.21 मार्च 2025 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या पतीसह जुन्या घराच्या भिंतीच्या विटा काढत होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या 7 वर्षीय बालिकेस त्यांच्या ओळखीचा मिस्तरी काम करणारा किसन ऊर्फ किश्या नामदेव गावीत, वय 38 वर्ष, रा. बंधारपाडा (वडगाव) ता.जि. नंदुरबार याने बालिकेस व्हेपर्स घेण्याच्या बहाण्याने दुकानावर जावुया असे आमिष देत सदर बालिकेस फिर्यादी यांच्या संमतीशिवाय सोनगीरपाडा धरणाकडे घेवून जात सदर बालिकेवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यावरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गुरनं- 112/2025 बी.एन.एस.- 65 (2), 137 (2) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 5 (एम) व 6 प्रमाणे पिडीत बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता व सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्ह्यातील आरोपी यास पोलीसांकडून तात्काळ अटक करण्यात आली होती. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस ठाणे प्रभारी सुनिल भाबड यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते व आरोपीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांच्या न्यायालयात सादर केले होते. सदर खटल्याची सुनावणी अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांच्या समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने महत्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीत बालिका xxxx वय-7 वर्षे, पिडीत बालिकेचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांनी आरोपीस बी.एन.एस. कलम 65(2), 137 (2) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4. 6 प्रमाणे दोषी ठरवत वीस वर्ष (20 वर्ष) सश्रम कारावास व रुपये 16000 दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्याचे सरकारी पक्षाच्या वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. बी.यु.पाटील यांनी कामकाज पाहिले असून मुख्य पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, कोर्ट पैरवी अंमलदार पोहेकों/नितीन साबळे, पोहेकॉ शैलेंद्र जाधव व पोहेकॉ राजेंद्र गावीत यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व जिल्हा सरकारी वकील अॅड.व्ही. आर. गोसावी यांनी अभिनंदन केले आहे.



