*जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयास राज्यस्तरीय A+ मानांकन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयास राज्यस्तरीय A+ मानांकन*
*जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयास राज्यस्तरीय A+ मानांकन*
नंदूरबार(प्रतिनिधी):-जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांनी राज्य शासनाच्या SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) अंतर्गत घेण्यात आलेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रियेत A+ श्रेणी मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
राज्यातील तब्बल 1,02,675 शाळांपैकी 10,644 शाळा पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी केवळ 429 शाळांना A+ दर्जा प्राप्त झाला असून त्यामध्ये जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांचा मानाचा समावेश झाला आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थेचे चेअरमन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांच्या सक्षम नेतृत्वात महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी सर्वांगीण विकास, सहशालेय उपक्रम, सामाजिक जाणीव, डिजिटल शिक्षण व्यवस्था, प्रयोगशाळा सुविधा, ग्रंथालय विकास व पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.
या गुणवत्ता मूल्यांकन प्रक्रियेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे समन्वयक म्हणून डॉ. मनोज शेवाळे यांनी अत्यंत नियोजनबद्ध व उत्कृष्ट कार्य केले. तसेच समिती सदस्य म्हणून प्रा. एस. जे. साक्रीकर, प्रा. अंकूश रघुवंशी आणि डॉ. डी. डी. गावीत यांनी मोलाचे सहकार्य केले. कनिष्ठ महाविद्यालयांच्या सर्व गटप्रमुखांनी, प्राध्यापकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे हे यश शक्य झाले.
या यशानिमित्त संस्थेचे व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक प्राचार्य पी. जे. रघुवंशी व उपप्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कनिष्ठ महाविद्यालयाचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी गुणवंत शिक्षक व समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच भविष्यातही जी. टी. पाटील कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक गुणवत्ता टिकवून अधिक उंच भरारी घेईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



