*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे प्रतीक!खा.अशोक चव्हाण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे प्रतीक!खा.अशोक चव्हाण*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे प्रतीक!खा.अशोक चव्हाण*
नांदेड(प्रतिनिधी):-पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीतील भाजपचा विजय हा देशाचे लोकप्रिय व खंबीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
या निकालांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला असून, आसाममध्ये पुन्हा सलग तिसऱ्यांदा स्वबळावर सत्ता मिळवली आहे. पुदुच्चेरीमध्येही भाजपची आघाडी सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. भाजपची सत्ता म्हणजे सुशासन आणि भाजपची सत्ता म्हणजे विकास, यावर देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांचा ठाम विश्वास असल्याचे या निकालातून सिद्ध झाले आहे. या विजयात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. नितीन नबीन, संबंधित राज्यातील भाजपचे नेते, उमेदवार आणि तमाम कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा मोठा वाटा असल्याचे खा. अशोक चव्हाण पुढे म्हणाले. मोदी सरकारच्या प्रत्येक निर्णयाला व धोरणाला केवळ राजकारण म्हणून विरोध करण्याच्या विरोधी पक्षांच्या भूमिकेचाही त्यांना फटका बसला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत विरोधी पक्षांनी भारतीय सैन्याच्या अधिकृत पत्रकार परिषदांवर विश्वास न ठेवता इतर देशांचे नेते किंवा वर्तमानपत्रे काय म्हणतात, यावर विश्वास ठेवला. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणी साठी एप्रिल 2026 मध्ये झालेल्या विशेष अधिवेशनात विरोधी पक्षांनी केवळ राजकारणापोटी विरोध केला. 'एसआयआर'द्वारे मतदार याद्यांच्या सुधारणेची प्रक्रिया लोकशाहीच्या दृष्टिकोनातून एक चांगला निर्णय होता. त्यालाही विरोधी पक्षांनी टोकाचा विरोध केला. याच मुद्द्यावर भाजपचे विरोधक बिहारची निवडणूक लढले आणि पराभूत झाले. पश्चिम बंगालमध्येही तृणमूल काँग्रेसने हा मुद्दा मोठा केला, मात्र त्यांनाही सत्ता गमवावी लागली. असे अनेक दाखले देत खा. अशोक चव्हाण यांनी विरोधकांच्या भूमिकेचा समाचार घेतला.



