*दस्त नोंदणी मर्यादित दिवसांमुळे नागरिकांची गैरसोय: कामकाज दररोज सुरू ठेवण्याची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*दस्त नोंदणी मर्यादित दिवसांमुळे नागरिकांची गैरसोय: कामकाज दररोज सुरू ठेवण्याची मागणी*
*दस्त नोंदणी मर्यादित दिवसांमुळे नागरिकांची गैरसोय: कामकाज दररोज सुरू ठेवण्याची मागणी*
राजापूर(प्रतिनिधी):-येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज आठवड्यातील केवळ तीन दिवसांपुरते मर्यादित केल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रार समोर आली आहे. कामकाज सर्व दिवस पूर्ण वेळ सुरू ठेवावे, अशी मागणी शहराध्यक्ष अझीम जैतापकर यांनी सह जिल्हा निबंधक, मुद्रांक रत्नागिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या मान्यतेनुसार व संबंधित आदेशान्वये 29 डिसेंबर 2025 पासून राजापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे कामकाज सोमवार, मंगळवार व बुधवार या तीनच दिवशी सुरू ठेवण्यात आले आहे. मात्र राजापूर तालुक्यात जमीन खरेदी-विक्रीसह विविध व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. मर्यादित दिवसांमुळे कार्यालयात गर्दी वाढत असून नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच कामकाजाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी आल्यास नागरिकांना आणखी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयात आठवड्याचे सर्व दिवस पूर्ण वेळ अधिकारी उपलब्ध करून द्यावेत व दस्त नोंदणीचे कामकाज नियमितपणे सुरू ठेवावे, अशी मागणी जैतापकर यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनाही सादर करण्यात आली आहे.



