*रोजगार निर्मितीसाठी जमीन किंवा निधी उपलब्ध करून देण्यासाठी लांजा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे आ.किरण सामंत यांना निवेदन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रोजगार निर्मितीसाठी जमीन किंवा निधी उपलब्ध करून देण्यासाठी लांजा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे आ.किरण सामंत यांना निवेदन*
*रोजगार निर्मितीसाठी जमीन किंवा निधी उपलब्ध करून देण्यासाठी लांजा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे आ.किरण सामंत यांना निवेदन*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील शहराच्या मध्यवर्ती भागात रोजगार निर्मिती हेतूने स्वतःचे कार्यालय किंवा इमारत उभारण्यासाठी 5 ते 10 गुंठे जमीन किंवा 25 ते 30 लाख इतके आर्थिक सहकार्य करावे अशी मागणी लांजा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीने (FPO) लांजा राजापूर साखरपा मतदार संघाचे आमदार किरण सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. लांजा, राजापूर तालुक्यात रोजगार निर्मिती करणे हाच एकमेव उद्देश कंपनीचा असून सातत्याने गेली 3 वर्षे ही कंपनी कार्यरत आहे परंतु स्वतःची जागा नसल्याने कंपनीच्या कामात अडथळे येत आहेत कंपनीची स्वतःची इमारत उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ व प्रक्रिया सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, ग्रामीण भागात थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे आ. सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सध्या आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीकडे 40 लाखाचा प्रोजेक्ट व 840 सभासद आहेत. रोजगार निर्मितीसाठी लागणारे सर्व परवाने आणि 3 वर्षांचा अनुभव गाठीशी आहे आपण आमच्या कंपनीच्या कार्यालयासाठी जागा किंवा प्रोजेक्टसाठी पैसे दिल्यास आपल्या विकास कामांना आमच्या रोजगार निर्मितीची जोड दिल्यास आपण करत असलेल्या कार्याला आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीची जोड मिळेल असे शेवटी निवेदनात नमूद केले आहे.