*‘मधुमित्र’ आणि ‘मधुसखी’ पुरस्कारांसाठी नामांकने सादर करावी-राजेश गवांदे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*‘मधुमित्र’ आणि ‘मधुसखी’ पुरस्कारांसाठी नामांकने सादर करावी-राजेश गवांदे*
*‘मधुमित्र’ आणि ‘मधुसखी’ पुरस्कारांसाठी नामांकने सादर करावी-राजेश गवांदे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने वर्ष 2026 साठी दिला जाणारा ‘मधुमित्र’ आणि ‘मधुसखी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, यासाठी पात्र मधपाळांकडून नामांकने मागविण्यात येत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी राजेश गवांदे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही पुरस्कार योजना राबविली जात आहे. यामध्ये मधमाशीपालनात उल्लेखनीय काम करणाऱ्या मधपाळांना तीन श्रेणींमध्ये गौरविण्यात येते. प्रथम पुरस्कार 11 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 7 हजार रुपये व तृतीय पुरस्कार 5 हजार रुपये असे आहे. विशेष म्हणजे, यातील एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मे 2026 पर्यंत असून पुरस्कार वितरण सोहळा जागतिक मधमाशी दिन 20मे 2026 पुणे येथे एका जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. इच्छुक उमेदवारांना अर्जाचा नमुना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mskvib.org उपलब्ध आहेत तसेच, प्रत्येक जिल्ह्यातील खादी मंडळाच्या कार्यालयातूनही नामांकनाचे अर्ज मिळवता येतील. भरलेले अर्ज 4 मे 2026 पूर्वी संबंधित जिल्हा कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. या पुरस्काराबाबत अधिक माहिती हवी असल्यास जिल्हा ग्रामोद्योग कार्यालय 02564-210053 व मध संचालनालय, महाबळेश्वर 02168-260264 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी गवांदे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



