*कृषी विभागातर्फे टाकन्यात आलेल्या धाडीत गुजरात राज्यातून विनापरवाना विविध प्रकारचा 61 हजार 130 रुपयांचा विक्रीस आणलेला खतांचा साठा जप्त*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृषी विभागातर्फे टाकन्यात आलेल्या धाडीत गुजरात राज्यातून विनापरवाना विविध प्रकारचा 61 हजार 130 रुपयांचा विक्रीस आणलेला खतांचा साठा जप्त*
*कृषी विभागातर्फे टाकन्यात आलेल्या धाडीत गुजरात राज्यातून विनापरवाना विविध प्रकारचा 61 हजार 130 रुपयांचा विक्रीस आणलेला खतांचा साठा जप्त*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील बायपास रस्त्यावरील अक्षर पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका गोदामावर गुप्त माहितीच्या अनुषंगाने कृषी विभागातर्फे टाकन्यात आलेल्या धाडीत गुजरात राज्यातून विनापरवाना विविध प्रकारचा 61 हजार 130 रुपयांचा विक्रीस आणलेला खतांचा साठा आढळून आला, याप्रकरणी दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गुणनियंत्रण निरीक्षक विशाल कैलास वाकचौरे यांना विनापरवाना खत विक्री होत असल्याची माहिती गुप्तहेराकडून मिळाली होती. त्यांनी तत्काळ शहादा शहरातील बायपास रस्त्यावरील भाड्याने घेतलेल्या गोदामाचे मालक धनंजय विनायक पाटील यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून गोदामाबाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडे खत विक्रीचा व साठवणुकीचा परवाना आढळून आला नाही. कृषी अधिकारी वाकचौरे यांनी तातडीने नंदुरबार येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्निल शेळके व तळोदा पंचायत समितीचे कृषी अधिकारी जयवंत पराडके यांना याबाबत माहिती दिली. तसेच शहादा पोलीस ठाण्यातून बंदोबस्त मागवत पंचांसमक्ष लोखंडी कुलूप तोडून गोदाम उघडण्यात आले, त्यात युरिया खताच्या पाच पिशव्या, 9:24:24 खताच्या पाच, तर मॅग्नेशियम सल्फेटच्या 58 असा एकूण 61 हजार 130 रुपये किमतीचा बेकायदेशीर खतसाठा आढळून आला. खत साठ्याबद्दल अधिक माहिती घेतली असता सदर खत गुजरात राज्यातील निझर तालुक्यातील चिनोदा येथील एका दुकानातून आणल्याचे समजले. खत विनापरवाना साठवणूक व विक्री केल्याप्रकरणी धनंजय विनायक पाटील तसेच मयंक कृषी सेवा केंद्र निझर गुजरात यांच्या विरुद्ध कृषी अधिकारी विशाल वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहादा पोलीस ठाण्यात खत नियंत्रण आदेश, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलम तसेच भारतीय न्याय संहिता कलम 316 व 318 (4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत.



