*खरवते फाटा येथे राजापूर सेंद्रिय ॲग्रो फार्मर प्रोडयुसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*खरवते फाटा येथे राजापूर सेंद्रिय ॲग्रो फार्मर प्रोडयुसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न*
*खरवते फाटा येथे राजापूर सेंद्रिय ॲग्रो फार्मर प्रोडयुसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न*
खरवते(प्रतिनिधी):-राजापूर सेंद्रिय ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड या कंपनीचे खरवते फाटा येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी वडदहसोळ जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रतीक शांताराम मटकर, खरवते गावचे सरपंच अभय चौगुले, गौरव सोरप, ग्रामपंचायत सदस्य किशोर चौगुले, गोठणे गावचे सरपंच विचारे, तसेच राजापूर तालुका कृषी विभागाचे सर्व अधिकारी वर्ग, आत्मा विभागाचे अमरे आदी मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याला तालुक्यातील शेतकरी वर्ग, ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.