*नंदनगरीतील ऐतिहासिक प्राचीन दत्त मंदिराचे उद्योगपती मनोज रघुवंशींच्या हस्ते भूमिपूजन,7 महिन्यात काम पूर्णत्वास; छत 14 तर 31 फुटांच्या घुमट*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदनगरीतील ऐतिहासिक प्राचीन दत्त मंदिराचे उद्योगपती मनोज रघुवंशींच्या हस्ते भूमिपूजन,7 महिन्यात काम पूर्णत्वास; छत 14 तर 31 फुटांच्या घुमट*
*नंदनगरीतील ऐतिहासिक प्राचीन दत्त मंदिराचे उद्योगपती मनोज रघुवंशींच्या हस्ते भूमिपूजन,7 महिन्यात काम पूर्णत्वास; छत 14 तर 31 फुटांच्या घुमट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील ऐतिहासिक, प्राचीन 130 वर्षांपूर्वीचे प्रभू श्री दत्त मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात असून, रविवारी अक्षय तृतीयेचा मुहूर्तावर उद्योगपती मनोज रघुवंशी, इंदिरा महिला सहकारी बँकेच्या चेअरमन कविता रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी 'गुरुदत्त भगवान की,जय' असा जयजयकार करण्यात आला
नंदुरबार शहरातील हाटदरवाजा परिसरात ऐतिहासिक असे प्राचीन 130 वर्षापूर्वीचे दत्त मंदिर आहे. मंदिराची स्थापना 1897 साली करण्यात आली. त्यावेळेस महादू झूगाजी शिंदे, गणपत कृष्णाजी शिंदे आणि मानाजी कृष्णाजी शिंदे यांनी मंदिर बांधकामासाठी जमीन दान दिली होती. 130 वर्षानंतर आता या मंदिराचे जीर्णोद्धार नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष, उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्या आर्थिक सहकार्यातून करण्यात येत आहे.
रविवारी अक्षय तृतीयेचा मुहूर्तावर सकाळी उद्योगपती मनोज रघुवंशी, इंदिरा महिला सहकारी बँकेचा चेअरमन कविता रघुवंशी भूमिपूजन करण्यात आले. तत्पूर्वी धार्मिक पूजा विधि झाली. याप्रसंगी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशी,शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, दत्त मंदिर संस्थानचे कार्याध्यक्ष जय शिंदे, सचिव उमेश दवे, रमेश माळी, किरण सैंदाणे, प्रकाश शिंदे, श्रीराम मोडक, इंजि.अनिल पाटील, जगदीश शिंदे, लक्ष्मीकांत शिंदे, जुगल शर्मा, श्रीराम दाऊतखाने, खगेंद्र शिंदे यांच्यासह भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. पौरोहित्य पंकज त्रिवेदी, जगदीश त्रिवेदी यांनी केले. 7 महिन्यात काम पूर्णत्वास येईल,
भूमिपूजन झाल्यानंतर आता बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करण्यासाठी दत्त मंदिर संस्थान प्रयत्नशील असून, येत्या डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीपूर्वी काम पूर्णत्वास नेऊन जीर्णोद्धाराचा विधी करण्यातील येईल.
अन् मंदिर जीर्णोद्धाराची संकल्पना,
मंदिराचा वाडा तयार करण्यासाठी देणगीची गरज होती. मंदिर संस्थान आणि पुजारी त्रिवेदी महाराज यांनी देणगी गोळा करायला सुरुवात केली. त्यावेळेस अनेक दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत केली. उद्योगपती मनोज रघुवंशी यांच्याकडे देणगी घ्यायला मंदिर संस्थानाचे सदस्य व पुजारी गेले असता मनोज रघुवंशी यांनी सढळ हस्ते मदत करीत जीर्णोद्धाराची संकल्पना मांडली. अन् काल रविवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भूमिपूजन झाले. मंदिर जीर्णोद्धाराच्या भूमिपूजनाचा मान मिळाल्याने भाग्यशाली समजतो. मंदिराचे कार्य डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्णत्वास येऊन दत्त जयंतीला विधिवत जीर्णोद्धार करण्यात येईल. मंदिराचे छत हे 14 फुट तर घुमट हा 31 फुटापर्यंत घेण्यात आला आहे. दाट वस्तीमुळे मंदिरात कमी प्रकाश पडणार असल्याने 1 लहान घुमट पिरॅमिडचा आकारात बसवण्यातील येईल. त्यामुळे मंदिरात प्रखर सूर्यप्रकाश पडेल. असे उद्योगपती म्हणून रघुवंशी यांनी सांगितले.



