*कुर्णे येथे 22 एप्रिलपासून श्री राधाकृष्ण मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कुर्णे येथे 22 एप्रिलपासून श्री राधाकृष्ण मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा*
*कुर्णे येथे 22 एप्रिलपासून श्री राधाकृष्ण मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील मौजे कुर्णे मधली पडये येथे श्री राधाकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा बुधवार 22 ते 25 एप्रिल 2026 या चार दिवसाच्या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे. बुधवार 22 एप्रिल रोजी सकाळी 9 वा. कलश मिरवणूक,दु. 2 ते 3 महाप्रसाद, सायं 7 वा. विविध स्पर्धा गुरुवार 23 रोजी स. 9 वा. संकल्प पुजा, गणेश पुजन, पुण्य हवन, देवता आवाहन श्री राधाकृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य विधीला सुरुवात होईल दु. 2 ते 3 महाप्रसाद, सायं 7 विविध स्पर्धा, सायं 8 वा. गुरव भजन मंडळ मानेवाडी कुर्णे यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे. दि.24 रोजी होम - हवन, अभिषेक, श्री राधाकृष्ण मूर्ती स्थापना, तत्वन्यास, श्री राधाकृष्णाची महापूजा, कलशारोपण,धवजारोहन दु. 2 वा महाप्रसाद आणि रात्री 10 वा श्री राधाकृष्ण नमन मंडळ, मधली पडये वाडी यांच्या बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे आणि शनिवार दि.25 एप्रिल रोजी सायं 3 वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं 5 वा हळदीकुंकू समारंभ, सायं 7 वा महाप्रसाद, रात्री 9 वा. बक्षीस वितरण कार्यक्रम व पाहुण्यांचे स्वागत तसेच 10.30 वा. श्री विराट विश्वकर्मा नाट्य नमन मंडळ, संगमेश्वर यांच्या नमनाचा कार्यक्रम होणार आहे. पंचक्रोशीतील सर्व भक्त भाविकांनी मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक श्री राधाकृष्ण मंदिर समिती, कुर्णे, श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान (रजि.) मुंबई व सहसमिती मुंबई - पुणे व कुर्णे यांच्या वतीने करण्यात आले आहे.



