*बागवेवाडीचे कुटरे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पांचाळ छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बागवेवाडीचे कुटरे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पांचाळ छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित*
*बागवेवाडीचे कुटरे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पांचाळ छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित*
राजापूर(प्रतिनिधी):-मुंबई मराठी युवा पत्रकार संघ, आदर्श मुंबई फाउंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज जीवनगौरव पुरस्कार कुटरे ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पांचाळ यांना 18 एप्रिल 2026 रोजी मुंबईमध्ये सिने अभिनेत्री सानिका मोजर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मंगेश पांचाळ हे मूळचे राजापूर तालुक्यातील बागवेवाडी येथील रहिवासी आहेत त्यांना क्रिकेट व गायनाची आवड आहे रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये त्यांची 31 वर्षे सेवा झालेली आहे. सेवा करत असताना गावातील गरजू वंचित घटक अपंग विधवा निराधार या लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिलेला आहे. गरिबांचा कैवारी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून ते परिचित आहेत त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे.कोरोना कालावधीमध्ये त्यांनी गायलेले 'बांधवानो घराबाहेर पडू नका' हे गीत जिल्हाभर व्हायरल झाले होते सेवा बजावत असताना त्यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झालेला आहे तसेच महाराष्ट्र न्यूज 18 संस्थेमार्फत भारत नॅशनल अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज गौरव पुरस्कार सांगली येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वतीने दिला जाणारा समाज रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे, सदरचे पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पंचायत समिती चिपळूण गटविकास अधिकारी उमा शिवाजीराव घारगे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर, विस्तार अधिकारी बि डी कांबळे, स्वप्नील कांबळे, डी वाय कांबळे, मिलिंद केळसकर, बी बी पाटील, केडी पवार, एकनाथ पाटील पंचायत समिती सर्व कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी संघटना चिपळूण मुंबई मंडळ बागवेवाडी ग्रामपंचायत कुटरे, महिला ग्राम संघ कुटरे, ग्रामस्थ कुटरे यांनी अभिनंदन केले आहे या पुरस्कार मिळाल्याबद्दल राजापूर तालुक्यासह चिपळूण तालुक्यातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



