*शहादा येथील आदिवासी वस्तीगृहातील मुलींना नित्कृष्ट जेवण देणा-या ठेकेदाराचा ठेका रद्द करा-बिरसा फायटर्सची मागणी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहादा येथील आदिवासी वस्तीगृहातील मुलींना नित्कृष्ट जेवण देणा-या ठेकेदाराचा ठेका रद्द करा-बिरसा फायटर्सची मागणी*
*शहादा येथील आदिवासी वस्तीगृहातील मुलींना नित्कृष्ट जेवण देणा-या ठेकेदाराचा ठेका रद्द करा-बिरसा फायटर्सची मागणी*
शहादा(प्रतिनिधी):-शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह शहादा येथील विद्यार्थ्यांनींना नित्कृष्ट जेवण देणा-या ठेकेदाराचा ठेका रद्द करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा मार्फत देण्यात आले आहे. शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह शहादा येथील विद्यार्थ्यांनींना नित्कृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जेवणात जळालेला भात व पाणीदार भाजी देत असल्याकारणाने विद्यार्थ्यांनींनी जेवणावर बहिष्कार टाकत अन्नत्याग उपोषण छेडले आहे. याप्रकाराकडे आदिवासी विकास विभागातील अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. ठेकेदार आपल्या फायद्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यीनीना निकृष्ट दर्जाचे जेवण देऊन आरोग्याशी खेळत आहे. निष्कृष्ट जेवणामुळे अनेक मुलींची तब्येत बिघडली आहे. मुलींचे अन्नत्याग आंदोलन ठिकाणी सहायक प्रकल्प अधिकारी यांनी भेट दिली व मुलींना तात्पुरतं आश्वासन दिले. मुलींना जेवण पुरवणा-या ठेकेदार नंदुरबार जिल्ह्यातील एका आमदाराचा माणूस असल्याने व मंत्रालय पर्यंत त्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने ठेकेदारावर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वसतीगृहातील मुलींचे अन्नत्याग आंदोलन व्यर्थ गेले की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. आंदोलन कर्त्यां आदिवासी मुलींनाही आपला वाली कुणीच नाही, असे वाटू लागले आहे. तरी शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह शहादा येथील विद्यार्थ्यांनींना नित्कृष्ट दर्जाचे जेवण देणा-या ठेकेदाराचा ठेका रद्द करून तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी. असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.



