*अनुदानित आदिवासी आश्रम शाळा सामोडे येथे अचानक 20 ते 25 मुला मुलींना, अन्नातून विषबाधाउलट्या, चक्कर व इतर त्रास,सर्व मुलींना ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे दाखल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अनुदानित आदिवासी आश्रम शाळा सामोडे येथे अचानक 20 ते 25 मुला मुलींना, अन्नातून विषबाधाउलट्या, चक्कर व इतर त्रास,सर्व मुलींना ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे दाखल*
*अनुदानित आदिवासी आश्रम शाळा सामोडे येथे अचानक 20 ते 25 मुला मुलींना,उलट्या, चक्कर व इतर त्रास,सर्व मुलींना ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे दाखल*
साक्री(प्रतिनिधी):-धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील अनुदानित आदिवासी आश्रम शाळा सामोडे येथे 15 एप्रिल 2026 रोज़ी अचानक 20 ते 25 मुलींना (विद्यार्थी) उलट्या, चक्कर व इतर त्रास सुरू झाला, सदर हे सर्व मुलींना ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर येथे दाखल करण्यात आले, सर्व मुलींवर योग्य उपचार झाले सदर मुलींची चर्चा केली असता, आश्रम शाळेत 14 एप्रिल 2026 चवळीची उसळ भिजत ठेवण्यात आलेली होती, आणि तीच चवळीची उसळ घटनेच्या दिवशी संध्याकाळी जेवणासाठी तयार केलेली होती, चवळी मेनु प्रमाणे जेवनात दिली जात नाही. सकाळी नाश्त्यात दिली जाते. काही मुलांनी मॅडमकडे तक्रार केली व तसेच अधीक्षकांना मुलांनी तक्रार केली असता, चवळीच्या उसळचा वास करत आहे, परंतु त्यांनी विद्यार्थ्यांना धमकावून खाण्यास सांगितले या विषयावर लक्ष न देता, त्याच्यामुळे हे सर्व विद्यार्थी मूलीन वर हा सगळा अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला, या झालेल्या प्रकरणात मुख्याध्यापक, अधिक्षक आणि अधिक्षिका हेच दोषी आहेत. विद्यार्थ्यांना शिळे अन्न खाण्यास भाग पाडले आणि काही काळानंतर अजून काही विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास झाला आणि रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना पुन्हा दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. या गंभीर घटनेची माहिती मिळताच, 16 एप्रिल 2026 रोज़ी सर्व कार्यकर्त्ते परिस्थिती जाणून घेण्यासाठी शाळा आणि ग्रामीण रुग्णालयात गेले. शाळेत जाऊन स्वयंपाकघर आणि मुलांच्या वसतिगृहाची पाहणी केली असता, वसतिगृहातील खोल्या आणि शौचालय, स्नानगृहे घाणीने भरलेली आढळली. विद्यार्थ्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, वसतिगृहाची स्वच्छता 10-12 दिवसांतून एकदाच केली जाते, ज्यामुळे खोलीतील अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे आजार पसरण्याची शक्यता आणखी जास्ती वाढते. शाळेत शासनाच्या परिपत्रकानुसार जेवणासाठी देण्यात येत असलेल्या मेनूचे साप्ताहिक वेळापत्रक दिले जाते, पण येथे त्याचे पूर्णपणे उल्लंघन केले जाते आणि प्रत्येकाच्या इच्छेनुसार जेवण दिले जाते, प्रश्न असा निर्माण होतो की, शाळेचे संचालक, मुख्याध्यापक, अधीक्षक आणि मुख्याध्यापिका हे आदिवासी सरकारकडून विद्यार्थ्यांना मिळणारे हक्क हिसकावून घेऊन केवळ स्वतःचे खिसे आणि घरे भरत आहेत, इयता 1ली ते 4 थी पर्यंत 30 ते 35 विद्यार्थी आहेत. शाळेत सुमारे 900 ते 950 विद्यार्थी दाखवले आहेत, परंतु हजर मात्र 400 ते 450 विद्यार्थी असतात. मेनु प्रमाणे जेवन दिले जात नाही. कागदोपत्री बिले तयार केले जातात. यातुन मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणुक करुन अनुदान लुटत आहेत. शाळेचे मुख्याध्यापक शहादा हुन नोकरी करायला आहे की शेती गहाण घेऊन शेती करायला आला आहे अशा प्रश्न निर्माण होतो. हजेरी भरुन शाळेतून गायब असतात याचा शाळेतील आदिवासी मुलांवर लक्ष्य नाही. हे सर्व संगणमत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे येथील अधिकारी यांच्या आशिर्वादाने हा सगळा भोंगळ कारभार चालु आहे. म्हणुन प्रशासनाचा निष्काळजीपणाही कुठेतरी जबाबदार आहे. सामोडे येथील या अनुदानित आदिवासी आश्रम शाळेचे वसतिगृह तुरुंगापेक्षाही वाईट अवस्थेत आहे. आदिवासी विद्यार्थी माणसे नाहीत का?
भारतीय संविधानाच्या कलम 21 अन्वये, स्वच्छ पर्यावरणासह निरोगी जीवनाचा समावेश आहे, परंतु आजही अनुदानित आश्रम शाळा सामोडे प्रशासनाकडून त्याचे स्पष्टपणे उल्लंघन केले जात आहे आणि हा सर्व आदिवासी मुलांवर अन्याय आहे. या हलगर्जी करणाऱ्या शाळा प्रशाशन, माध्यमिक मुख्याध्यापक व अधिक्षक व अधीक्षिका यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी कारवाई न झाल्यास आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जो खेळ चालू आहे, आश्रमशाळेविरुद्ध आम्ही तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे
गणेश गावित
जिल्हाप्रमुख महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान धुळे यांनी सांगितले आहे.



