*समाज क्रांतीकारक महात्मा बसवेश्वर महाराजांना बालवीर चौकात अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*समाज क्रांतीकारक महात्मा बसवेश्वर महाराजांना बालवीर चौकात अभिवादन*
*समाज क्रांतीकारक महात्मा बसवेश्वर महाराजांना बालवीर चौकात अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-थोर समाज सुधारक, क्रांतिसूर्य, लिंगायत धर्माचे संस्थापक, समाज क्रांतीकारक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या 895 व्या जन्मोत्सवानिमित्त बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर येथे महाराष्ट्र बसव परिषद नंदुरबार जिल्हा शाखा, शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ आणि वीरशैव लिंगायत गवळी समाज, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री मोठा मारुती मंदिर संस्थानचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले. तर महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांनी पुष्पार्पण केले. याप्रसंगी बोलताना रणजीतसिंग राजपूत म्हणाले की, 12 व्या शतकात समता नायक, महात्मा बसवेश्वर महाराज यांनी तत्कालीन काळात महिलांना सर्वोच्च स्थान देऊन समाजात क्रांती घडविली. विश्वगुरू म्हणून असलेले महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साता समुद्रापार लंडन देशात महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. संपूर्ण जगाला अभिमान ठरेल अशा महात्मा बसवेश्वराचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असेही रणजीतसिंग राजपूत यांनी सांगितले. महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या कर्नाटक राज्यातील बसवकल्याण, अनुभव मंडप आणि भालकी येथील कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सल्लागार निवृत्त शिक्षक जी.एस.गवळी यांनी केले. कार्यक्रमास सहकार भारतीच्या नंदुरबार जिल्हा महिला संघटन प्रमुख सुरेखा वळवी, भिवसन वळवी, छाया जैन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश जैन, सामाजिक कार्यकर्त्या सुलभा महिरे, गवळी समाज महिला मंडळाच्या सुनिता हिरणवाळे, नंदा हिरणवाळे, विमल हिरणवाळे,भाग्यश्री हिरणवाळे, कल्पना गवळी, रोशनी गवळी, विजया महिला मंडळाचे अध्यक्ष बी.डि. गोसावी, सेवा वर्धिनीचे भोजराज शेंडे, नगर पालिका निवृत्त कर्मचारी पांडुरंग यादबोले, श्याम गवळी, धर्मेंद्र गवळी, जगन खेडकर, मल्हार सेनेचे दत्तू सूळ, भास्कर रामोळे, अमित कापडणे, आदींसह समाज बांधव महिला पुरुष आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे, संभाजी हिरणवाळे, विशाल हिरणवाळे, सुदाम गवळी, तसेच शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ पदाधिकाऱ्यांनी केले.



