*'मिशन लक्षवेध' अंतर्गत हॉकी आणि शूटिंगसाठी खेळाडूंची निवड चाचणी, 21 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावे-सुनंदा पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*'मिशन लक्षवेध' अंतर्गत हॉकी आणि शूटिंगसाठी खेळाडूंची निवड चाचणी, 21 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावे-सुनंदा पाटील*
*'मिशन लक्षवेध' अंतर्गत हॉकी आणि शूटिंगसाठी खेळाडूंची निवड चाचणी, 21 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करावे-सुनंदा पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने राज्यातील क्रीडा विकासासाठी 'मिशन लक्षवेध' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत जिल्ह्यासाठी हॉकी आणि शूटिंग (नेमबाजी) या दोन क्रीडा प्रकारांची निवड करण्यात आली असून, जिल्हास्तर क्रीडा विकास प्रतिभा केंद्रासाठी (DSTDC) खेळाडूंची निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र खेळाडूंनी आपले अर्ज 21 एप्रिल 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. निवडीसाठीचे निकष: वयोमर्यादा खेळाडूचे वय 31 डिसेंबर रोजी 21 वर्षांखालील असणे आवश्यक आहे (मुले व मुली).
क्रीडा कामगिरी खेळाडूने किमान राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभाग घेतलेला असावा किंवा पदक प्राप्त असावे. मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरी, कौशल्य आणि शारीरिक तंदुरुस्ती (Fitness) या आधारावर निवड केली जाईल.
अधिवास खेळाडू महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. आवश्यक कागदपत्रे अर्जदारांनी अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या प्रती जोडणे अनिवार्य आहे, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला. रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाईल) आणि आधार कार्ड. मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे. शाळा/महाविद्यालय बोनाफाईड प्रमाणपत्र आणि पालकांचे संमती पत्र. 03 पासपोर्ट साईज फोटो. शासनमान्य डॉक्टरांचे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र.
अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक भगवान पवार दूरध्वनी क्रमांक ९८५०५५९५०९ यांच्याशी संपर्क साधावा, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



