*मेरा युवा भारत केंद्र नंदुरबार तर्फे कोठली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मेरा युवा भारत केंद्र नंदुरबार तर्फे कोठली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा*
*मेरा युवा भारत केंद्र नंदुरबार तर्फे कोठली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा*
शहादा (प्रतिनिधी):-युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार संचलीत मेरा युवा भारत केंद्र नंदुरबार व युवकमित्र परिवार कोठली ता. शहादा या युथ क्लब मार्फत कोठली ता.शहादा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राथमिक. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धाचे आयोजन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमा सुरुवात करण्यात आली. तसेच राज्यघटना प्रास्ताविकचे सामूहिक वाचन करण्यात आले.तसेच स्वच्छता अभियान राबवण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रामदास गवळे, प्रमुख अतिथी म्हणून पोलिस पाटील सुखदेव पाटील, युवकमित्र संस्थेचे संस्थापक प्रवीण महाजन, माजी उपसरपंच ठाणेसिंग गिरासे, ग्रामसेविका योगिता निकम, मुख्याध्यापक सचिन मोरे, शिक्षिका शुभांगी बडगुजर, शिक्षण घनश्याम मोरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवकमित्र संस्थेचे गोपाल अजबसिंग गिरासे यांचे सहकार्य लाभले तर प्रास्ताविक गोकुळ माळी यांनी केले.



