*कृषि विभाग अॅक्शनमोडवर, जिल्ह्यात कृषि सेवा केंद्रांची झाडाझडती, जास्तीचा युरीया व डिएपी उचल केलेल्या शेतकऱ्यांची होत आहे पडताळणी, बोगस खरेदी करणाऱ्यांवर बसणार लगाम, आधारसह ईपॉस / अॅग्रीस
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कृषि विभाग अॅक्शनमोडवर, जिल्ह्यात कृषि सेवा केंद्रांची झाडाझडती, जास्तीचा युरीया व डिएपी उचल केलेल्या शेतकऱ्यांची होत आहे पडताळणी, बोगस खरेदी करणाऱ्यांवर बसणार लगाम, आधारसह ईपॉस / अॅग्रीस
*कृषि विभाग अॅक्शनमोडवर, जिल्ह्यात कृषि सेवा केंद्रांची झाडाझडती, जास्तीचा युरीया व डिएपी उचल केलेल्या शेतकऱ्यांची होत आहे पडताळणी, बोगस खरेदी करणाऱ्यांवर बसणार लगाम, आधारसह ईपॉस / अॅग्रीस्टॅक द्वारे खत खरेदी, राहणार बंधनकारक*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हयातील गुणवत्तापूर्ण व दर्जेदार खतांचा वेळेवर पुरवठा होणेकरीता कृषि विभाग कटिबध्द आहे. या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात माहे एप्रिल 2026 या महिन्यात शेतकऱ्यांच्या शेतात पिकाची लागवडीचा कालावधी नसतानादेखिल काही कृषि सेवा केंद्रांनी युरीया व डिएपी या खतांची जवळपास 1030 शेतकऱ्यांना जास्तीची विक्री केली आहे. यामूळे कृषि विभाग नंदुरबारकडून सदर कृषि सेवा केंद्रांची मोहिम स्वरूपात तपासणी सुरु असून 1 एप्रिल पासून आतापर्यंत 102 कृषि सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली असून, जास्तीची उचल केलेल्या 1030 शेतकऱ्यांची पडताळणी सहाय्यक कृषि अधिकारी यांचेमार्फत करण्यात आले आहे. सदर मोहिमे दरम्यान ज्या खत विक्रेते यांनी खत विक्रीमध्ये अनियमितता केली असेल अशा खत विक्रतेवर कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सद्यास्थितीत कृषि आयुक्तालय स्तरावर तक्रार निवारण कक्ष सुरु असुन त्याचा संपर्क दूरध्वनी क्रमांक 18002334000 तर व्हॉटसअॅप क्रमांक 9822446655 असा आहे. त्याचबरोबर नंदुरबार जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 9404110878 / 7588763089 असे आहेत. तरी जिल्हयातील शेतकरी यांनी त्यांना पिक क्षेत्रानुसार आवश्यक असलेले खत ई-पॉस मशिनव्दारेच कृषि सेवा केंद्र वरुन खरेदी करावे. अधिकचा खत साठा खरेदी करु नये असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, शंकर किरवे व किशोर हडपे, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडून करण्यात आले आहे.



