*ABRSM संलग्न नंदुरबार येथे शिक्षक परिषदेतर्फे 'महारक्तदान शिबिर' उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ABRSM संलग्न नंदुरबार येथे शिक्षक परिषदेतर्फे 'महारक्तदान शिबिर' उत्साहात संपन्न*
*ABRSM संलग्न नंदुरबार येथे शिक्षक परिषदेतर्फे 'महारक्तदान शिबिर' उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ABRSM संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग), जिल्हा शाखा नंदुरबार तर्फे भव्य 'महारक्तदान शिबिरा'चे आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सामाजिक सभागृह, साक्री नाका येथे मंगळवारी पार पडलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सलग 8 व्या वर्षी शिक्षक परिषदेने सामाजिक बांधिलकीची ही परंपरा यशस्वीपणे जपली आहे. शिक्षकांसह समाजातील विविध स्तरातील रक्तदात्यांनी सहभाग घेऊन समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. शिबिराला माजी खासदार हिना गावित, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, महिला आघाडी अध्यक्ष डॉ. सुप्रिया नटावकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान करून त्यांचा उत्साह वाढवण्यात आला.
यावेळी मराठा समाज युवा परिवर्तन चळवळीचे जिल्हाध्यक्ष दिनेश भाऊ मराठे आणि अक्कलकुवा महाविद्यालयाचे प्रा. डॉ. जितेंद्र बागुल यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वतः रक्तदान करून उपक्रमाला हातभार लावला. "बदलूया जग शिक्षणाने, वाचवूया प्राण रक्तदानाने" हा संदेश देत शिक्षक परिषदेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी सर्व रक्तदाते व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.



