*अवैधपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे इसम नंदुरबार शहर पोलीसांच्या ताब्यात, डायल 112 वर प्राप्त कॉलचे आधारे शहर बीट मार्शल अंमलदार यांनी 07 व्या मिनीटाला घटनास्थळ गाठत केली कारवाई*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अवैधपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे इसम नंदुरबार शहर पोलीसांच्या ताब्यात, डायल 112 वर प्राप्त कॉलचे आधारे शहर बीट मार्शल अंमलदार यांनी 07 व्या मिनीटाला घटनास्थळ गाठत केली कारवाई*
*अवैधपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे इसम नंदुरबार शहर पोलीसांच्या ताब्यात, डायल 112 वर प्राप्त कॉलचे आधारे शहर बीट मार्शल अंमलदार यांनी 07 व्या मिनीटाला घटनास्थळ गाठत केली कारवाई*
नंदुरबार(प्रतिनिधी):-14 एप्रिल 2026 रोजी रात्रगस्तकामी डयुटीवर असलेले बीट मार्शल पोलीस अंमलदार पोकॉ/432 राजेश वसावे यांना डायल 112, नियंत्रण कक्ष, नंदुरबार येथील महिला अंमलदार पोना/116 कांती वसावे यांचेकडून सकाळी ठिक 4.58 वाजता कॉल प्राप्त झाला की, नंदुरबार शहरातील करण चौफुली कडून धुळे चौफुलीच्या दिशेने एक आयशर वाहन क्र. MH 18 BZ 3712 यामध्ये गोवंशीय जनावरे यांना चारा पाण्याची सोय न करता त्यांना हालचाल करता येणार नाही अशा स्थितीत लहान दोऱ्यांनी घट्ट बांधुन क्रुरतेने व निर्दयतेने कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतुक करणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्याअन्वये सदर बाब बोट मार्शल यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश देसले यांना माहिती कळवित सोवत स्टाफसह लागलीच घटनास्थळ गाठले. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शहर पोलीसांनी सापळा रचून करण चौफुली कडुन येणाऱ्या रोडने एक पांढऱ्या रंगाच्या आयशर वाहनास थांबवुन तपासणी करता त्यामध्ये लहान दोरीच्या सहाय्याने गोवंशीय जनावरे यांना हालचाल करता येणार नाही अशा स्थितीत जखडून बांधुन ठेवले असल्याचे दिसले. सदर वाहनावरील इसमांची चौकशी करता त्यांची नावे किरण दिलीप पाटील, वय 30 वर्षे, रा.छाईल, ता. साक्री जि. धुळे 2. गणेश नाना बरडे, वय 29 वर्षे, रा. बासर ता.साक्री जि. धुळे 3. खंडू अनिल बरडे, वय-19 वर्षे, रा.बासर ता. साक्री जि. धुळे 4. अंकुश अर्जुन बागुल, वय 35 वर्षे, रा. इसडे, ता. साक्री जि. धुळे असे सांगितले. त्यांना सदर वाहनातील गोवंशीय जनावरांबाबत विचारणा करता त्यांचेकडे काही एक संयुक्तिक उत्तर नसल्याने ते असंबंध्द अशी उत्तरे देऊ लागले, सदर कारवाईत एकुण 23 गोवंशीय जनावरे व वाहन असा एकुण 12 लाख 81 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असुन वर नमुद आरोपीविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 429/2026 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 5 (ए), 5 (बी), 9 व प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम
1960 चे कलम 192 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सर्व जनावरांची सुटका करुन त्यांची तातडीने चारापाण्याची व्यवस्था करुन त्यांना गोशाळेत दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश देसले, पोउपनि किरण पाटील, छगन चव्हाण, भुनेश मराठे, पोहेकों/भटु धनगर, पंकज महाले, किरण मोरे, प्रविण वसावे, भगवान मुंडे, नरेंद्र पाडवी, मपोकों/निंबाबाई वाघमोडे, बीट मार्शल पोकों/ 432 राजेश वसावे यांनी केली आहे. नंदुरबार जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या आजुबाजूला कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, गुन्हेगारी घटना किंवा संशयास्पद हालचाल दिसुन आल्यास त्वरीत डायल 112 या क्रमांकावर संपर्क साधुन माहिती दयावी. आपल्या सतर्कतेमुळे व वेळेवर दिलेल्या माहितीचे आधारे पोलीसांना तात्काळ प्रतिसाद देऊन गुन्हे प्रतिबंध करणे तसेच जिवीत व मालमत्तेचे संरक्षण करणे सहज शक्य होईल.



