*डी. आर. हायस्कूल येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डी. आर. हायस्कूल येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन*
*डी. आर. हायस्कूल येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, नंदुरबार येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन नरेंद्र सराफ, प्रमुख वक्ते म्हणुन पंचायत समिती तळोदा येथील ग्रामपंचायत अधिकारी मुकेश कापुरे, नंदुरबार येथील अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, मुख्याध्यापक मोहन अहिरराव, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, सारंग बुवा, पर्यवेक्षक संजय सैंदाणे, हेमंत खैरनार, अमोल पाटोळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आशीत कांबळे यांनी महापुरुषांकडे आपल्या आई- वडिलांसारखे बघावे तसेच बाबासाहेबांना भारताच्या इतिहासात सर्वोच्च स्थान आहे असे सांगितले. दुसरे अतिथी मुकेश कापुरे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकत संविधान बनविताना बाबासाहेबांनी समानतेचा विचार केला, आपल्या जीवनात हिंसेचे कधीही समर्थन केले नाही असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात नरेंद्र सराफ यांनी बाबासाहेबांची उंची कोणी गाठू शकत नाही तसेच बाबासाहेबांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे हे सांगितले.जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार विक्रम परदेशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती प्रमुख राजश्री गायकवाड राजेंद्र लांडगे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
मान्यवर परिचय व स्वागत सत्कार आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष नरेंद्र मनोहर सराफ चेअरमन नंदुरबार एज्युकेशन सोसायटी नंदुरबार, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मुकेश प्रताप कापुरे ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार, प्रमुख वक्ते आशित नामदेव कांबळे अपर पोलीस अधीक्षक पोलीस मुख्यालय नंदुरबार, शाळेचे मुख्याध्यापक मोहन लोटन अहिरराव मुख्याध्यापक आणि प्राचार्य श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल जुनियर कॉलेज नंदुरबार, शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम अरुण मोडक उपमुख्याध्यापक श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल नंदुरबार, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पाटील जयश्री तर आभार प्रदर्शन विक्रम परदेशी यांनी व्यक्त केले.



