*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या तांत्रिक त्रुटींचे निवारण करणे, प्रलंबित KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करणे व वंचित लाभार्थीना न्याय मिळवून देण्याबाबत नंदुरबार जिल्हा युवा क्रांती संघ
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या तांत्रिक त्रुटींचे निवारण करणे, प्रलंबित KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करणे व वंचित लाभार्थीना न्याय मिळवून देण्याबाबत नंदुरबार जिल्हा युवा क्रांती संघ
*मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या तांत्रिक त्रुटींचे निवारण करणे, प्रलंबित KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करणे व वंचित लाभार्थीना न्याय मिळवून देण्याबाबत नंदुरबार जिल्हा युवा क्रांती संघटनेतर्फे निवेदन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या तांत्रिक त्रुटींचे निवारण करणे, प्रलंबित KYC प्रक्रिया पुन्हा सुरू करणे व वंचित लाभार्थीना न्याय मिळवून देण्याबाबत नंदुरबार जिल्हा युवा क्रांती संघटनेतर्फे नवापुर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. 'युवा क्रांती नंदूरबार सामाजिक संघटना' (युवती विंग) कडे प्राप्त झालेल्या लाभार्थी महिलांच्या तक्रारी व जनआक्रोश. युवा क्रांती नंदूरबार सामाजिक संघटना (युवती विंग) या निवेदनाद्वारे आपले लक्ष वेधू इच्छिते की, महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना कार्यान्वित केली आहे. परंतु, नंदूरबार जिल्ह्याच्या दुर्गम आणि ग्रामीण भागात या योजनेची अंमलबजावणी करताना प्रशासकीय स्तरावर अनेक तांत्रिक पेच निर्माण झाले असून, परिणामी हजारो पात्र महिला या लाभापासून पूर्णतः वंचित राहिल्या आहेत.
सद्यस्थितीत, अनेक महिलांनी योजनेचे अर्ज यशस्वीरीत्या भरलेले असूनही त्यांच्या खात्यावर अद्याप लाभाची रक्कम जमा झालेली नाही. याचे मुख्य कारण असे की, मोठ्या प्रमाणात महिलांची ओळख पडताळणी (KYC) प्रक्रिया अपूर्ण आहे. विशेष बाब ही की, ज्या महिलांची ही प्रक्रिया चुकली आहे त्यांना दुरुस्तीची संधी संकेतस्थळावर देण्यात आली आहे, मात्र ज्या भगिनी तांत्रिक बिघाडामुळे किंवा माहितीअभावी पडताळणी करण्याची मूळ संधीच मुकल्या आहेत, त्यांना देण्यात आलेला नाही. अशा महिला प्रशासकीय उंबरठे झिजवत असूनही त्यांना संकेतस्थळावर पुन्हा पडताळणी करण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध करून कोणताही दिलासा मिळत नसल्याने महिलावर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. तसेच, नवीन लाभार्थीची नोंदणी प्रक्रिया मागील अनेक कालावधीपासून बंद करण्यात आली आहे, ज्यामुळे नवीन पात्र ठरू शकणाऱ्या महिलांना या योजनेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचे प्रतीत होत आहे. प्रशासन एकीकडे योजनेचा प्रचार करत असताना दुसरीकडे मात्र तांत्रिक पर्यायांची उपलब्धता करून देण्यास अपयशी ठरत आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. ज्या महिलांची ओळख पडताळणी प्रक्रिया अद्याप झालेली नाही, त्यांच्यासाठी संकेतस्थळावर तात्काळ 'विशेष सुविधा' उपलब्ध करून द्यावी. प्रलंबित अर्जाची तातडीने तपासणी करून पात्र महिलांचे रखडलेले सर्व हप्ते एकत्रितपणे जमा करण्यात यावेत. नवीन नोंदणीसाठी संकेतस्थळ पुन्हा खुले करण्यात यावे.
प्रशासनाने येत्या 7 दिवसांच्या आत यावर ठोस कार्यवाही न केल्यास, संपूर्ण जिल्ह्यातून हजारो पीडित महिलांच्या उपस्थितीत युवा क्रांती नंदूरबार सामाजिक संघटना तहसील कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन करण्यात असा इशारा तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे, निवेदनावर युवा क्रांती सामाजिक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष एडवोकेट सोनाली वळवी यांच्यासह तालुकाध्यक्ष सारिका गावित व परिसरातील महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



