*देवरे विद्यालयात क्षयरोग विषयी क्ष किरण तपासणी शिबिर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात क्षयरोग विषयी क्ष किरण तपासणी शिबिर संपन्न*
*देवरे विद्यालयात क्षयरोग विषयी क्ष किरण तपासणी शिबिर संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील धंगाई विधायक कार्य मंडळाचे आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत(NTEP) प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत या अभियानांतर्गत भव्य क्षयरोग क्ष- किरणाद्वारे तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. विनोद नाईक, डॉ.सतीश नांद्रे वैद्यकिय अधिकारी, लहान शहादे, डॉ. हेमांगी आगळे सीएचओ, चौधरी आरोग्य सेवक, हिना वळवी आरोग्य सेविका जयंत पाटील, ग्लोरी घुमारी, पद्माकर कळणे या अधिकारी पथकाने परीश्रम घेतले. पथकातील सर्व अधिकाऱ्यांचा विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी स्वागत सत्कार केला. विद्यालयातील विद्यार्थ्यांचा, मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची क्ष- किरण तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. डी.नेरकर व आभार वाय.डी.बागुल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सी. व्ही.नांद्रे,डी.बी. भारती एम.एस. मराठे, ए.एस.बेडसे एस.एच.गायकवाड तसेच डी. बी. पाटील, एस.जी. पाटील, एच. एम. खैरनार यांनी संयोजन केले.



