*ग्रामविकासातील उत्तंग व्यक्तीमत्व, आदर्श सरपंच पद्मश्व पोपटराव पवार यांचे 18 एप्रिल रोजी रायपाटण येथे व्याख्यान*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ग्रामविकासातील उत्तंग व्यक्तीमत्व, आदर्श सरपंच पद्मश्व पोपटराव पवार यांचे 18 एप्रिल रोजी रायपाटण येथे व्याख्यान*
*ग्रामविकासातील उत्तंग व्यक्तीमत्व, आदर्श सरपंच पद्मश्व पोपटराव पवार यांचे 18 एप्रिल रोजी रायपाटण येथे व्याख्यान*
पाचल(प्रतिनिधी):-यशोगाथा ग्रामविकासाची या विषयावर ग्रामविकासातील उत्तंग व्यक्तीमत्व, आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचे व्याख्यान शनिवार 18 एप्रिल 2026 रोजी श्री वडचीआई मंदिर प्रागंण राय पाटण येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामविकासाकरीता महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या, समाजासाठी अविरतपणे काम करणाऱ्या महनीय अशा व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री, खासदार नारायणराव राणे, आमदार किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समृद्ध कोकण आणि जागृत सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचे यशोगाथा ग्रामविकासाची या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले असून त्यांचे विचार ऐकण्याची मोठी संधी तालुकावासियांना मिळणार आहे. हे व्याख्यान ग्रामविकासाची नवी दिशा देणारे असून हा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम ठरणार आहे. सर्वानी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समृद्ध कोकण आणि जागृत सेवा मंडळ रायपाटण यांनी केले आहे.