*ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन-सुंदरसिंग वसावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन-सुंदरसिंग वसावे*
*ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन-सुंदरसिंग वसावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राज्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम’ 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत साजरा करण्यात येत असून या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर, नागरिक मेळावा आणि भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे हे विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आई- वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम 2010 तसेच राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण 2013 बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच सामाजिक ऋणाची जाणीव ठेवून नागरिकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे हा कार्यक्रमाचे मुख्य उद्देश असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या मेळाव्याला व रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त, वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



