ताजा खबरे:
*सिने-नाट्य सांस्कृतिक गुढीचा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न*
*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*
*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*
*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*
*पवन ऊर्जात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी घेतली अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांची भेट*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*

  • Share:

*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*
नंदूरबार(प्रतिनिधी):- नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता 3 री मध्ये शिकणाऱ्या ब्रायन राहुल गावीत या 9 वर्षीय निष्पाप बालकाचा मृतदेह उघड्या सेप्टिक टँकमध्ये संशयास्पद स्थितीत आढळल्याने संपूर्ण जिल्हा हादरला असून, शासकीय आश्रमशाळा आता विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘मृत्यूचा सापळा’ बनत चालल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. ही घटना निव्वळ अपघात नसून शाळा प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा आणि ही एक प्रकारची ‘प्रशासकीय हत्या’ असल्याचा घणाघाती आरोप ‘युवा क्रांती’ सामाजिक संघटनेने केला आहे. 4 एप्रिल रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेत विद्यार्थी बेपत्ता असतानाही मुख्याध्यापक आणि अधीक्षकांनी तात्काळ पोलीस तक्रार का केली नाही, असा सवाल उपस्थित करत पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी मोठे षडयंत्र रचले गेल्याचा दाट संशय संघटनेने व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी शाळेतील काही कर्मचारी मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होते, असा खळबळजनक आरोप पालकांनी केल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
​या गंभीर प्रकरणाची दखल घेत युवा क्रांती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, संबंधित मुख्याध्यापक, अधीक्षक आणि जबाबदार शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 106, 125, 3(5) व 188 अन्वये तात्काळ सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच पीडित आदिवासी कुटुंबाला शासनाकडून 25 लक्ष रुपयांची आर्थिक मदत मिळावी आणि स्थानिक पोलिसांकडून तपास काढून घेऊन तो तात्काळ ‘राज्य गुन्हे अन्वेषण विभाग’ (CID) कडे वर्ग करावा, अशी  मागणी करण्यात आली आहे. जर येत्या 72 तासांत दोषींना बेड्या ठोकल्या नाहीत, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
​यावेळी उपजिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन  देताना युवा क्रांती संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. सोनाली वळवी, प्रदेश समन्वयक विजयसिंग पाडवी, प्रदेश सरचिटणीस ॲड. दिपक वसावे, जिल्हाध्यक्ष इंजि. संदीप वळवी, युवती जिल्हाध्यक्षा ॲड. यशो वसावे, जिल्हा संघटक नितेश वसावे, तालुकाध्यक्ष अविनाश गावित, युवती तालुकाध्यक्ष सारिका गावित, तालुका कार्याध्यक्ष आकाश गावित, योगेश गावित व इतर सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असून या घटनेचे सत्य जनतेसमोर येण्यासाठी सीआयडी चौकशी अनिवार्य असल्याचे मत यावेळी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सिने-नाट्य सांस्कृतिक गुढीचा पहिलावहिला कलावंत मेळावा दिमाखात संपन्न*
April, 08 2026
*साकुर्डे स्पोर्ट्स क्लब आयोजित साकुर्डे प्रीमियर लीग (SPL) चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला श्रीसाई समर्थ क्रिकेट संघ*
April, 08 2026
*गुरव ज्ञाती संस्था आयोजित रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न*
April, 08 2026
*ब्रायन गावीत मृत्यू प्रकरण, तपास सीआयडीकडे वर्ग करा, युवा क्रांतीचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यां मार्फत राज्य शासनाला निवेदन*
April, 08 2026
*पवन ऊर्जात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी घेतली अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षांची भेट*
April, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज