*हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन*
*हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हात नंदुरबार व नवापूर विभागात बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या वतीने विविध सामाजिक व जनहिताचे कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नवापूर येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक जितेंद्र वळवी प्रमुख उपस्थित होते. तसेच यावेळी जिल्हाप्रमुख पंडित माळी, जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, उपजिल्हाप्रमुख गोटू पाटील, तालुकाध्यक्ष कल्पित नाईक, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे यासह इतर पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
बैठकीत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्ष निमित्त विचारांचा वारसा जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये जिल्हाभर रक्तदान शिबिरांचे आयोजन, युवकांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे घेणे, तसेच गावागावात नवीन शाखा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले.
याशिवाय, प्रत्येक तालुक्यात आणि गावपातळीवर सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवून शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी काळात या सर्व कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देखील सोपवण्यात आल्या.
बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार करत समाजसेवेच्या माध्यमातून जनतेशी नाळ अधिक घट्ट करण्याचा संकल्प केला.



