*सुरगाणा तालुक्यात भूकंप हाद-यांची मालिका सुरुच, कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसल्याने अनर्थ टळला, केवळ एका घराच्या भिंतीला तडा, नागरिकांनी खबरदारी घेत भयभीत होत पहाटेच भर झोपेत घराच
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सुरगाणा तालुक्यात भूकंप हाद-यांची मालिका सुरुच, कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसल्याने अनर्थ टळला, केवळ एका घराच्या भिंतीला तडा, नागरिकांनी खबरदारी घेत भयभीत होत पहाटेच भर झोपेत घराच
*सुरगाणा तालुक्यात भूकंप हाद-यांची मालिका सुरुच, कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसल्याने अनर्थ टळला, केवळ एका घराच्या भिंतीला तडा, नागरिकांनी खबरदारी घेत भयभीत होत पहाटेच भर झोपेत घराच्या बाहेर रस्त्यावर*
सुरगाणा(प्रतिनिधी):-तालुक्याचा पश्चिम उंबरठाण पट्टा पुनश्च एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला असून अनेक गावातील नागरिक भीती पोटी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान भर झोपेतून उठून रस्त्यावर आल्याचे
समजते. एक महिन्यापुर्वी
गुरुवार 5 मार्ग 2026 रोजी रात्री 11.59 मिनिटांनी याच भागात उंबरठाण, निंबारपाडा, चुली, राशा, गुही, कृष्णनगर आदी गावांना सौम्य धक्का जाणवला होता. साधारणतः महिनाभरात दुस-यांदा आज गुरुवार 2 एप्रिल 2026 रोजी भल्या पहाटे 5.28 ते 5.30 वाजेच्या सुमारास ठिक ठिकाणी या पुर्वी पेक्षा मोठा धक्का बसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पांगारणे, गोंदुणे, रघतविहीर, गुही, जामुनपाडा, खुंटविहीर, रानविहीर, अंबाठा, लोळणी, उंबरठाण, निंबारपाडा,
दातरीचापाडा, अलंगुण, कोठुळा, खांदुर्डी, सुभाषनगर, डोल्हारे, पळसन, अंबाठा, सतखांब, जामुनमाथा, मोकपाडा, पालविहीर, केळीपाडा, चिंचले,
कृष्णनगर, पिंपळसोंड, उंबरपाडा तातापानी, चापावाडी, बोरीपाडा, रानविहीर, उदालदरी, गोणदगड, आदीसह परिसरातील 35 ते चाळीस गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत.
शासनाने याची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करीत याच भागात भूकंप मापक यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी परिसरातील माजी सरपंच रमेश वाडेकर, धनजी चौधरी, संतोष सहारे, महेंद्र पवार, जितेंद्र गायकवाड, नवसू गायकवाड, बळवंत अलबाड
यांनीनी केली आहे. झालेल्या भूकंपाची नोंद मेरी येथील भूकंप मापक केंद्रात 2.3 रिश्टर स्केल नोंद झाल्याचा अहवाल मेरी संस्थेकडून प्राप्त झाला आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता भूकंपाचे धक्के जाणवले तर यावेळी तहसीलदार रामजी राठोड यांनी लागलीच ताबडतोब घराबाहेर मोकळ्या जागेत थांबावे. भांबावून जाऊ नये. रात्री, अपरात्री हातात विजेरी घेऊन बाहेर पडतांना विजेच्या तारा व खांब खाली पडले नसल्याची खात्री करावी. या रिपोर्ट शासनाकडे पाठवला आहे. हादरे बसलेल्या गावात स्वत: भेट देत खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच भूकंप प्रवण गावांना भेटी देऊन सविस्तर माहिती घेऊन शासनाला कळविण्यात येईल. नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले.



