*राजापूरातील मंदार जयंत दातार यांने डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल 'माय राजापूर' ने केला सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राजापूरातील मंदार जयंत दातार यांने डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल 'माय राजापूर' ने केला सत्कार*
*राजापूरातील मंदार जयंत दातार यांने डॉक्टरेट पदवी संपादन केल्याबद्दल 'माय राजापूर' ने केला सत्कार*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील दातार छापखान्याचे मालक जयंत दातार यांचा मुलगा मंदार जयंत दातार यांने मुंबई ''हार्डवेअर फॉर हाय परर्फॉर्मन्स कॉम्प्यूटिंग" या विषयात डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. मंदार यांचे सहावी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा गुजराळी येथे झाले तर सहावी ते दहावी पर्यंत राजापूर हायस्कूल व अकरावी, बारावी रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर काॅलेज मध्ये झाले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक विषयात इंजिनिअर पदवी रत्नागिरीतील फिनोलेक्स काॅलेजमधून पूर्ण केली त्यानंतर आयआयटी मुंबई येथून एम टेक पदवी प्राप्त केली याबद्दल 'माय राजापूर' चे जगदीश पवार व संदीप देशपांडे यांनी मंदार दातार यांच्या निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच त्यांच्या आई वडिलांचेही अभिनंदन करण्यात आले. त्याशिवाय 'माय राजापूर' चे संस्थापक प्रदीप कोळेकर यांनीही मंदार दातार याला पुढील वाटचालीसाठी दुरध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या
मंदार दातार यांच्या सत्कार समारंभावेळी सौ. राधिका गुणे, डॉक्टर सुयोग परांजपे उपस्थित होते.



