*शहरातील तीन प्रमुख चौक उजळले, आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शहरातील तीन प्रमुख चौक उजळले, आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण*
*शहरातील तीन प्रमुख चौक उजळले, आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील महाराणा प्रताप पुतळा, खोडाई माता मंदिर परिसर आणि जगताप वाडी चौक आता हायमस्ट लाईटच्या प्रकाशाने झगमगून गेले आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या 3 हायमस्ट लाईट्सचे लोकार्पण शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. हायमस्ट लाईटच्या प्रकाशाने शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. नगरपालिके मार्फत शहरात साडेबारा मीटर उंचीचे आणि 200 वॅट क्षमतेचे 3 हायमस्ट लाईट बसविण्यात आले आहेत. या कामाचे उद्घाटन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्विच दाबून केले. शहरातील महाराणा प्रताप पुतळा, खोडाई माता मंदिर परिसर आणि जगताप वाडी चौक प्रकाश व्यवस्थेमुळे झगमगून गेली असून, सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाची भर पडली आहे. या उद्घाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, आरोग्य सभापती देवेंद्र जैन, आरोग्य सभापती प्रीतम ढंडोरे, बाजार समिती सभापती दीपक मराठे, नगरसेवक रविंद्र पवार, अमित परदेशी, गौरव चौधरी, मोहितसिंग राजपूत, भरत चौधरी, कमल ठाकूर, अतुल पाटील, आकाश अहिरे यांसह मान्यवर उपस्थित होते.



