ताजा खबरे:
*'टीबी मुक्त भारत'साठी 100 दिवसांच्या विशेष मोहिमेचा प्रारंभ, जागतिक क्षयरोग दिन उत्साहात; क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप*
*मंदाणे येथे स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न*
*सौरऊर्जा प्रकल्प प्रकरणी प्रशासनाचा ठाम खुलासा, आरोप निराधार असल्याचा दावा*
*शेजवलीचे सरपंच मंदार राणे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित*
*आबिटमध्ये 'मासूम 'च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*'टीबी मुक्त भारत'साठी 100 दिवसांच्या विशेष मोहिमेचा प्रारंभ, जागतिक क्षयरोग दिन उत्साहात; क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*'टीबी मुक्त भारत'साठी 100 दिवसांच्या विशेष मोहिमेचा प्रारंभ, जागतिक क्षयरोग दिन उत्साहात; क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप*

  • Share:

*'टीबी मुक्त भारत'साठी 100 दिवसांच्या विशेष मोहिमेचा प्रारंभ, जागतिक क्षयरोग दिन उत्साहात; क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा क्षयरोग केंद्राच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार जेथे विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 'प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान 2.0' अंतर्गत जिल्ह्यात 100 दिवसांच्या विशेष टीबी मुक्त अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच जिल्हा क्षयरोग केंद्र नंदुरबार येथील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य परिचारिका, नर्सिंग कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी क्षयरोगाचे जीवाणू शोधणारे शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांनी 'टीबी मुक्त भारत' अभियानाची शपथ घेतली. जिल्ह्यातील नागरिकांनी 'निक्षय मित्र' बनून क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन मदत करावी, असे आवाहन यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. महेंद्र चव्हाण यांनी केले. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले तसेच शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष दीपक पाटील यांनी निक्षयमित्र बनून 40 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वितरण केले. तर छत्रपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे NTVS नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी क्षयरोग विषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केली. तालुकास्तरावर जनजागृती रॅली, आशा सभा, माहिती पुस्तिकांचे
वाटप तसेच कम्युनिटी मिटिंग्स आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षयरोग पर्यवेक्षक अनिल पाटील यांनी केले तर वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश सूर्यवंशी यांनी आभार मानले. 'टीबी मुक्त भारत' 100 दिवसीय मोहिमेचा उद्देश, जिल्ह्यात टीबी निर्मूलनासाठी पुढील 100 दिवसांत विशेष मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये संशयित रुग्णांचा शोध, त्वरित तपासणी, नियमित उपचार आणि पोषण सहाय्य यावर विशेष भर दिला जाणार आहे. उच्च जोखमीच्या भागांमध्ये विशेष तपासणी शिबिरे, घरभेटी आणि संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली जाणार आहे. यासंदर्भातील माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांनी दिली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*'टीबी मुक्त भारत'साठी 100 दिवसांच्या विशेष मोहिमेचा प्रारंभ, जागतिक क्षयरोग दिन उत्साहात; क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप*
March, 26 2026
*मंदाणे येथे स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न*
March, 25 2026
*सौरऊर्जा प्रकल्प प्रकरणी प्रशासनाचा ठाम खुलासा, आरोप निराधार असल्याचा दावा*
March, 25 2026
*शेजवलीचे सरपंच मंदार राणे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित*
March, 25 2026
*आबिटमध्ये 'मासूम 'च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न*
March, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज