ताजा खबरे:
*मंदाणे येथे स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न*
*सौरऊर्जा प्रकल्प प्रकरणी प्रशासनाचा ठाम खुलासा, आरोप निराधार असल्याचा दावा*
*शेजवलीचे सरपंच मंदार राणे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित*
*आबिटमध्ये 'मासूम 'च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न*
*पाणी आंदोलकांच्या मागण्यांबाबत आरे प्रशासन चर्चेस तयार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मंदाणे येथे स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मंदाणे येथे स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न*

  • Share:

*मंदाणे येथे स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अडी- अडचणीवर विचार मंथन व ज्येष्ठांचे मार्गदर्शनासाठी जि. प. मराठी शाळेच्या प्रांगणात स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघाची सभा धुळे फेस्काॅम खानदेश विभागाचे अध्यक्ष अरुण माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेचे प्रमुख वक्ते खानदेश प्रादेशिक विभागाचे मुख्य समन्वयक अॅड. एम. एस. पाटील, प्रमुख पाहुणे दुर्गा खांडसरीचे (मेंद्रांणा) कार्यकारी संचालक कैलास चंद गोयल, खानदेश प्रादेशिक विभागाचे कोषाध्यक्ष प्रकाश लाडगे, उपाध्यक्ष अरविंद पाखले, प्रसिद्ध प्रमुख राजेंद्र पाटील, जिल्हा संघटक गुलाब पाटील, सचिव आर. टी. खैरनार, संचालक रामजी पाटील, जिल्हा समन्वयक प्रताप चव्हाण, शहादा तालुका अध्यक्ष प्रा. जे. डी. पाटील, जिल्हा संघटक के.डी. गिरासे, अॅड. युवराज देसले, मंदाना ग्रामपंचायत सरपंच सुशीला पवार, उपसरपंच शरद साळुंखे, सचिव गजानन विसपुते, का. प्रा.वि. सदस्या डॉ. सुलभा कुवर, उज्वला पाटील आदी उपस्थित होते. दिप प्रज्वलन, साने गुरुजींची खरा तो एकची धर्म या प्रार्थनेनंतर व्यासपीठावरील प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. प्रमुख वक्ते अॅड. एम. एस. पाटील आपल्या भाषणात म्हणाले, हे गाव पेटवणारे नसून विजवणारे आहे. समाजात ज्या गोष्टींची गरज नाही, त्या गोष्टी आपण त्याज्य केल्या पाहिजे. श्रीमंत म्हणून मरण्यापेक्षा श्रीमंत होऊन जगा. ज्येष्ठ नागरिक संघ चालवणे सोपे नाही. संघात सामील होताना 90% सभासद मागणारे तर 10 टक्के सभासद देणारी असतात. तसेच समाजाचे आहे, आयुष्य समाजात काढतात, पण समाजाला काहीच देत नाही. काही लोकांना पावसात रडणे आवडते, कारण पावसात रडली तर आपले अश्रू इतरांना दिसत नाही. आपले दुःख आपणच सहन करतो, इतरांना सांगून ते कमी होत नाही. पण दुःख आले, की त्या मागे सुख आपोआप येत असते , मुलींचे लग्न आई-वडील लावून देतात. पण मोबाईल व आई काही दिवसात मुलींच्या घटस्फोट घडून आणण्यास कारणीभूत होतात. या लोकांना व समाजाला वठनीवर आणण्याचे कार्य जेष्ठ नागरिक संघ करत असतो, असे शेवटी म्हणाले. त्यानंतर कैलास चंद्र गोयल, प्रतापराव चव्हाण, सुलभा कुवर, सचीव आर.टी. खैरनार यांची भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात तहसीलदार अरुण माळी म्हणाले, आज आम्ही 496 व्या स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संघाला अधिकृत मान्यता देत आहोत. फेस्काम मध्ये 70 महिला संघाची निर्मिती झाली आहे. महिला संघाची निर्मिती म्हणजे महिलांना व्यासपीठ देणे. त्यांना त्यांची जाणीव करून दिली तर त्या महिलांमध्ये जाऊन जागृती निर्माण करू शकतात. असे शेवटी म्हणाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी विवेकानंद संघाचे अध्यक्ष मार्तंड भामरे, उपाध्यक्ष पी. टी. पवार, खजिनदार विजय मोरे, सचिव शिवाजी मोरे, सहसचिव भालेराव साळुंखे, शिवाजीराव देसले, अनिल भामरे, दिलीप गांगुर्डे, संपत कोठारी व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. जगन्नाथ पाटील, किशोर चित्ते, रघुनाथ बेलदार, मोरे, पवार व गावातील आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन किशोर मोरे यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मंदाणे येथे स्वामी विवेकानंद ज्येष्ठ नागरिक संघाची सभा संपन्न*
March, 25 2026
*सौरऊर्जा प्रकल्प प्रकरणी प्रशासनाचा ठाम खुलासा, आरोप निराधार असल्याचा दावा*
March, 25 2026
*शेजवलीचे सरपंच मंदार राणे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित*
March, 25 2026
*आबिटमध्ये 'मासूम 'च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न*
March, 25 2026
*पाणी आंदोलकांच्या मागण्यांबाबत आरे प्रशासन चर्चेस तयार*
March, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज