*आबिटमध्ये 'मासूम 'च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आबिटमध्ये 'मासूम 'च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न*
*आबिटमध्ये 'मासूम 'च्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न*
चिपळूण(प्रतिनिधी):-23 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आबिटगाव ग्रामपंचायतीमध्ये 'मासूम' (महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ) पुणे यांच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले. मासूमच्या उपक्रमातील 2 महिलांचा शारिरीक आणि भावनिक आरोग्याचा अधिकार या अंतर्गत अँनिमिया मुक्त भारतच्या समर्थनार्थ हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली. 'मासूम' ची स्थापना डॉ.मनीषा गुप्ते आणि डॉ. रमेश अवस्थी यांनी 1987 साली केली. त्यांनी लोकशाही, समानता, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर 1991 मध्ये या संस्थेच्या माध्यमातून आरोग्यविषयक कार्यक्रमाची सुरुवात केली. समाजातल्या सर्वात वंचित आणि उपेक्षित घटकांना आरोग्यसेवेचा लाभ घेता यावा आणि त्याची मागणी करता यावी यासाठी त्यांना सक्षम करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भारतातील 'आरोग्य हक्क चळवळीत ' 'मासूम'चा सुरुवातीपासून सक्रिय सहभाग राहिला आहे. या संस्थेने कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात संविधान संवर्धन फोलोशिप कार्यक्रम 2022 ते 2025 मध्ये राबविला आता कोकणातील जिल्ह्यात फेलोच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या संविधान संवर्धन फेलोशिप कार्यक्रमाचे प्रोजेक्ट लिडर योगेश हुपरीकर यांच्या मार्गदर्शनाखालील होत आहे. या हिमोग्लोबीन तपासणीला समाजसेवक विलास भागो डिके व नर्स श्रद्धा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या आरोग्य शिबीराला सरपंच सुहास भागडे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या आरोग्य शिबीराला आरोग्यसेवक दिपक लिंगायत, CHO रुपाली गाडेकर, आरोग्यसेविका दिपिका भंडारी आणि आशासेविका भाग्यश्री भागडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हा हिमोग्लोबीनचा कार्यक्रम मासूम संस्थेचे फेलो (संविधान संवादक) संदिप शंकर येलये यांनी आयोजित केला. या आरोग्य शिबीरात हिमोग्लोबीन तपासून ज्याचे कमी आहे अशांना तीन महिन्याच्या आयरन च्या गोळ्या मोफत देण्यात आल्या. या शिबीराचा फायदा आबिटगावातील होत महिलांना व समाजातील सर्व घटकांना होत आहे.



