*सौरऊर्जा प्रकल्प प्रकरणी प्रशासनाचा ठाम खुलासा, आरोप निराधार असल्याचा दावा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सौरऊर्जा प्रकल्प प्रकरणी प्रशासनाचा ठाम खुलासा, आरोप निराधार असल्याचा दावा*
*सौरऊर्जा प्रकल्प प्रकरणी प्रशासनाचा ठाम खुलासा,आरोप निराधार असल्याचा दावा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये राबविण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांवर प्रशासनाने ठामपणे भूमिका मांडत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाला नसून प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार पार पडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, हा प्रकल्प भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत मंजूर करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभाग, धुळे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया, पुरवठादारांची निवड, तसेच साहित्याची तांत्रिक तपासणी आणि देयके अदा करण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित तांत्रिक यंत्रणेकडेच होती.
यामुळे प्रकल्प कार्यालय किंवा स्थानिक अधिकारी -कर्मचाऱ्यांचा या प्रक्रियेत कोणताही थेट सहभाग नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये करण्यात आलेले आरोप वस्तुस्थितीशी विसंगत असून, कोणत्याही ठोस पुराव्याविना करण्यात आलेले असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रशासनाने पुढे सांगितले की, अशा प्रकारच्या आधारहीन बातम्यांमुळे कार्यालयाची आणि कर्मचाऱ्यांची प्रतिमा मलिन होत असून, जनतेमध्ये चुकीचा संदेश जात आहे. त्यामुळे सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडणे आवश्यक असल्याने हा खुलासा प्रसिद्ध करण्यात आला आहे. दरम्यान, प्रकल्पाची अंमलबजावणी करताना सर्व तांत्रिक निकष आणि शासकीय नियमांचे पालन करण्यात आले असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित विभागाकडून आवश्यक त्या सर्व तपासण्या पूर्ण केल्यानंतरच देयके अदा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रशासनाने नागरिकांना अपूर्ण व अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत, कोणतीही शंका असल्यास अधिकृत स्रोतांकडून माहिती घेण्याचेही आवाहन केले आहे.



