*आंगले बौध्दवाडीतील धोकादायक वीज खांब बदलले, सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांच्या प्रयत्नाना यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आंगले बौध्दवाडीतील धोकादायक वीज खांब बदलले, सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांच्या प्रयत्नाना यश*
*आंगले बौध्दवाडीतील धोकादायक वीज खांब बदलले, सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांच्या प्रयत्नाना यश*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील आंगले गावातील बौद्ध वाडी येथील धोकादायक स्थितीत असलेले लाईटचे जुनं गंजलेले पोल आंगले गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांच्या प्रयत्नाने बदलण्यात आले आहेत, या कामी बौद्ध वाडीतील ग्रामस्थ व तसेच आयु. अरुण नारायण तांबे यांनी विशेष सहकार्य केले तसेच राजापूर महावितरणचे कर्मचारी वायरमन आयु. महेश तांबे यांनी सुद्धा या कामाकरिता मोलाचे सहकार्य केले असे सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी सांगितले. पावसाला सुरू होण्यापूर्वी धोकादायक पोल बदलणे गरजेचे होते गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी सातत्याने पुढाकार घेऊन महावितरणकडे पाठपुरावा केला आणि जीर्ण गंजलेले पोल बदलून घेतले असे बौध्द वाडीतील ग्रामस्थ आयु. अरुण नारायण तांबे यांनी पत्रकार प्रमोद तरळ यांच्याशी बोलताना सांगितले गावच्या विकासासाठी सातत्याने अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांचे बौध्द वाडीतील ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार मानण्यात आले आहेत व त्यांच्या सामाजिक कार्याला खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.



