*होतकरू,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप नीधी उपलब्धतेसाठी आयोजित संकल्प चषक 2026 उत्साहात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*होतकरू,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप नीधी उपलब्धतेसाठी आयोजित संकल्प चषक 2026 उत्साहात संपन्न*
*होतकरू,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप नीधी उपलब्धतेसाठी आयोजित संकल्प चषक 2026 उत्साहात संपन्न*
विरार(प्रतिनिधी):-संकल्प सामाजिक संस्था मुंबईच्या वतीने दि 15 मार्च 2026 रोजी अग्रवाल मैदान विरार (पश्चिम) येथे भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तरी सदर स्पर्धेत ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबईच्या 12 संघांनी सहभाग घेतला होता. दरवर्षी विविध उपक्रम राबवून जमा होणारा निधी शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी वापरला जातो. तसेच आपल्या कोकणातील ज्या मुलांचे पालक नाहीत किंवा आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. क्रिकेट म्हटलं की,आपला जीव कि प्राण तसेच क्रिकेट खेळावर प्रेम करणाऱ्यां क्रिकेट रसिकांनी रंगतदार सामन्यांचा मनसोक्त आनंद घेतला. संस्थेच्या आयोजनाचे हे तिसरे पर्व आनंदमय वातावरणात संपन्न झाले. काही सामने इतके रोमहर्षक झाले होते तर काही एकतर्फी झाले. अंतिम सामना सिध्दीविनायक मधलीवाडी वि. ब्राम्हणदेव लिंगवाडी यांच्यामध्ये झाला त्यामध्ये सिध्दीविनायक मधलीवाडी संघाने विजयी चौकार मारून संकल्प चषकावरती आपले नाव कोरण्यात यशस्वी झाले तसेच
यंग इलेव्हन कुंभार वाडी आणि व्ही.सी. सी.चिखले कातळ वाडी संघांना अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला रोख रक्कम 13 हजार तसेच उपविजेत्या संघाला रोख रक्कम 7 हजार आणि आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. सामन्यातील उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करणारे खेळाडू उत्कृष्ट फलंदाज- मनोहर भोवड (ब्राम्हणदेव लिंगवाडी),उत्कृष्ट गोलंदाज- सुताल सातोपे (मधलीवाडी), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वप्निल खावडकर (मधलीवाडी), सामनावीर -योगेश लाखण (मधलीवाडी), मालिकावीर महेश कुंभार (मधलीवाडी)
त्याच बरोबर मान्यवरांचा सत्कार सोहळा आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी म्हणून समीर डिके यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सदर स्पर्धेला खेड तालुका रहिवाशी मंच दिवा शहर संघटचे अध्यक्ष सतीश निकम, संदेश कदम, समाजसेवक विनायक भुवड, प्रमोद लाड, शाहिर रुपेश मांडवकर, अशोक पाटील, मंगेश मांडवकर आदी मान्यवर उपस्थिती होते. सदर स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संकल्प सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.



