*कोकण रहिवाशी मंडळ, टिटवाळाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात व दिमाखात संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कोकण रहिवाशी मंडळ, टिटवाळाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात व दिमाखात संपन्न*
*कोकण रहिवाशी मंडळ, टिटवाळाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात व दिमाखात संपन्न*
टिटवाळा(प्रतिनिधी):-19 मार्च 2026 रोजी एकविरा सोसायटी, इंदिरानगर, टिटवाळा येथे गुढीपाडव्याच्या मंगलमय आणि शुभ मुहूर्तावर कोकण रहिवाशी मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्याचे अत्यंत उत्साही आणि आनंदमयी वातावरणात आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच परिसरात उत्साहाची लहर पसरलेली होती. आकर्षक सजावट, पारंपरिक वेशभूषा आणि मंगलमय वातावरणामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा प्राप्त झाली होती.
या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष यशवंत परब (बुवा) आणि उपाध्यक्ष शंकर पेंडुरकर यांनी आपल्या मनोगतात मंडळाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, 2015 साली गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी काही समविचारी व्यक्तींनी एकत्र येऊन या मंडळाची स्थापना केली. सुरुवातीला छोट्या स्वरूपात सुरू झालेले हे मंडळ आज वटवृक्षाप्रमाणे विस्तारले असून, समाजात एक मजबूत आणि विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे.
मंडळाने गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवून समाजसेवेचे एक उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा, जेष्ठ नागरिकांसाठी सन्मान सोहळा, महिलांसाठी हळदी -कुंकू समारंभ, तसेच कौटुंबिक सहलींचे आयोजन करण्यात येते. याशिवाय गरजवंतांना कपड्यांचे वाटप, आर्थिक मदत, धान्य किट वितरण, रक्तदान शिबिरे अशा विविध उपक्रमांतून मंडळ सातत्याने समाजसेवा करत आहे. विशेषतः कोरोना काळात मंडळाने उल्लेखनीय कार्य केले. लसीकरणासाठी मदत, गरजूंना अन्नधान्य पुरवठा, तसेच विविध सामाजिक समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाशी संपर्क ठेवून पाठपुरावा करण्यात आला. रस्ते व पाणी समस्यांबाबतही मंडळाने सक्रिय भूमिका बजावत नागरिकांना दिलासा दिला.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन प्रकाश चौगुले आणि राजेंद्र पिंपुटकर यांनी अत्यंत कुशलतेने केले. कार्यक्रमस्थळी सौ. मनाली शिंदे यांनी काढलेली सुंदर आणि आकर्षक रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
या यशस्वी कार्यक्रमासाठी मंडळाचे सभासद, कार्यकारिणी सदस्य, सल्लागार व हितचिंतक यांनी मनापासून सहकार्य केले. सौ. करूणा परब, पूर्वा टोले, दिपाली नाईक, रिया परब, दयाघन नाईक, दिलीप चिपकर, गोविंद बारस्कर, नितीन कदम, भिवाजी धुरे, विनायक दळवी, निळकंठ साटम, संतोष चव्हाण, अमित पांचाळ, उमेश नाईक, स्वप्निल मोडक, अन्मय पांचाळ, दिव्य परब, शौर्य सावंत आदी सर्वांनी एकजुटीने काम करत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, सदस्य व नागरिकांनी एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. या सोहळ्याने मंडळाच्या एकात्मतेची, समाजसेवेची आणि सांस्कृतिक परंपरेची प्रचिती सर्वांना दिली. “एकजुटीतून सेवा, सेवेतून समाजाचा विकास” या ब्रीदवाक्याला साजेसा हा सोहळा ठरला.



