*देवरे विद्यालयात जागतिक चिमणी दिना निमित्ताने सामाजिक संदेशाद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात जागतिक चिमणी दिना निमित्ताने सामाजिक संदेशाद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन*
*देवरे विद्यालयात जागतिक चिमणी दिना निमित्ताने सामाजिक संदेशाद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील नक्षत्र छंद मंडळ, नंदुरबार व धंगाई विधायक कार्य मंडळ म्हसदी संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक चिमणी दिनानिमित्ताने चिमण्यांचे निसर्गातील महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी तयार केलेले टाकाऊ पासून टिकाऊ अन्नधान्य व पाण्याची व्यवस्था असणारे घरटे सदृश्य भांडे तयार करून समाजाला चिमणी संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे उपशिक्षक डी.बी. भारती यांनी जागतिक चिमणी दिवसाची पार्श्वभूमी व निसर्ग चक्रातील चिमणी पक्षाचे महत्व आज वाढते प्रदूषण, झपाटाने होत असलेले काँक्रेटीकरण, शहरीकरण, घरांच्या संरचनेतील बदल, अन्नपाण्याची प्राणी, पक्षी यांना कमतरता शहरात, राज्य, राष्ट्रीय महामार्गावर वाढते मोबाईल टॉवर यामुळे चिमणींचे घटत चाललेले प्रमाण वाढले असून चिमणीचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज ओळखून चिमणी पर्यावरणाच्या संतुलनात महत्त्वाची भूमिका बजावते. चिमणी किटक जीव-जंतू खाऊन शेतीचे होणारे नुकसान टाळते. पर्यावरणातील जैव विविधतेचे महत्त्व पटवून देणे घर परिसरात शालेय परिसरात शेतात पशुपक्ष्यांसाठी पाणी व धान्य ठेवण्याचे सवय लावणे. पाणी व धान्य ठेवण्यासाठी भांडे तयार करणे. याविषयी माहिती दिली. विद्यालयाचे उपशिक्षक सी.व्ही. नांद्रे यांनी चिमणी वाचवा व पर्यावरण वाचवा विषयावर मार्गदर्शन करत चिमण्यांना 'पर्यावरणाचे संरक्षक' मानले जाते. पक्ष्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणथळींच्या जागांची निर्मिती करणे, त्यासोबतच धान्य उपलब्ध करून देणे, उरलेले अन्न पक्षांना टाकणे, आपल्या घराजवळ बाहेर चिमणी साठी दाणा-पाण्याची व्यवस्था आपण करूया असे आवाहन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी चिमण्यांच्या अन्नपाण्याची सोय करण्याच्या हेतूने तयार केलेल्या नारळाच्या करवंटी पासून, कापूस तसेच पालापाचोळा पासून तयार केलेल्या घरट्यांचं परीक्षण एस.एच. गायकवाड, व्ही.बी. अहिरे, ए.एस.बेडसे यांनी करून तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात प्रथम क्रमांक दर्शन विकास पाटील, द्वितीय मानसी प्रकाश पाटील, तर चैताली राहुल पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. विद्यालयातर्फे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम.एस. वानखेडे ज्येष्ठ शिक्षक माध्यमिक विद्यालय सोमावल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. अध्यक्ष भाषणाद्वारे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके यांनी विद्यार्थ्यांच्या स्वनिर्मित दाणापाण्याची व्यवस्था करणारे घरट्याचे निरिक्षण केले. पर्यावरण संवर्धनात आपण मानवाने सहकार्याची व सहभागी होण्याचे आवाहन करत विद्यालयातील 1156 वृक्षांच्या सानिध्यात चिमणी पाखरांसाठी घरटे व अन्नधान्य, पाण्याची व्यवस्था करणाऱ्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करत घरट्यांची, अन्नपाणी पुढील व्यवस्था विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जबाबदारी घेतल्यामुळे या सर्वांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.डी. नेरकर व आभार वाय. डी. बागुल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी. बी.पाटील, एस.जी. पाटील, एच.एम. खैरनार यांनी संयोजन केले.



