*नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आता दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे कामी,सोमवार बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस कामकाज चालणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आता दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे कामी,सोमवार बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस कामकाज चालणार*
*नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आता दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे कामी,सोमवार बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस कामकाज चालणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बंधू- भगिनींना कळविण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या मागणीला यश मिळाले असून जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या आदेशान्वये नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आता दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणे कामी सोमवार बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस कामकाज चालणार असून उपजिल्हा रुग्णालय तळोदा व उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे देखील दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र व यु डी आय डी मिळणार आहेत. जेणेकरून दिव्यांग बंधू भगिनींची हेळसांड होणार नाही. धडगाव, अक्कलकुवा व शहादा येथील दिव्यांग बांधवांना तळोदा येथे आपले दिव्यांग प्रमाणपत्र मिळवता येईल तर नवापूर येथील बांधवांना नंदुरबार येथे येण्याची आवश्यकता नाही त्यांना तिथेच उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्याची सोय करण्यात आली आहे, याची सर्व दिव्यांग बंधू-भगिनी यांनी नोंद घ्यावी.